मुंबई : नक्षत्र आपली जागा प्रत्येकवेळी बदलत असतो. या नक्षत्रांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिष विज्ञानानुसार कोणता ग्रह आपल्या कुंडलीत प्रवेश करतो यावरून आपला दिवस ठरत असतो. पाहूया १२ राशींच भविष्य..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - धन लाभ होण्याचा योग आहे. शत्रूंवर आज विजय मिळवू शकता. ऑफिसमध्ये जास्त काम करावं लागेल. नोकरीत चांगली बढती मिळू शकते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून आनंद मिळण्याची दाट शक्यता. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्वाचा 


वृषभ - तुमच्या बोलण्याचा आणि कामाचा परिणाम इतरांवर होत असतो. मोठ्या कार्यक्रमात आज जाणं होईल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे चांगली काम हातून घडतील. काही जुने वाद संपतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. 


मिथुन- पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. इनकम वाढीचे चांगले पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. नवीन मित्र होतील यांचा आगामी काळात फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या जुनी दुखणी डोकं वर करतील. 


कर्क- या राशीच्या लोकांनी पूर्ण लक्ष करिअरकडे द्यावं. तुम्ही थोडे मुडी आणि संवेदनशील आहात. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होईल. आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुमच्या आयुष्यात जे संकट असतील त्याच गोष्टी उद्या सकारात्मकता घेऊन येणार आहे. 


सिंह - सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. कोणत्याही कठिण परिस्थितीचा आज सामना कराल. आज मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रश्न सुटेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
 
कन्या - आजचा दिवस अतिशय सामान्य आहे. काही अर्धवट राहिलेले व्यवहार आज पूर्ण होतील. काही नवीन प्लानिंह कराल. कुटुंबासोबत परदेश दौऱ्याचा योग आहे. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावा. 


तूळ - आज तुमची काम रखडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरू झालं की ते पूर्ण करूनच सोडा. काही आर्थिक व्यवहार कराल. पण ते थोडं सांभाळून करा. तूळ राशीच्या लोकांची वेळ आता चांगली आहे. महत्वाची काम आज करून घ्या. 


वृश्चिक - आज कामात तुमचं पद वाढू शकतं. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे. डोक्यात अनेक गोष्टी असतील ज्याचा परिणाम आजच्या दिवसावर होणार आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करा. नोकरीत स्वतःच्या प्रदर्शनावर लक्ष द्या. 


धनू - महत्वाच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ घालवाल. पैशांच्या स्थितीचा थोडा विचार करा. काही नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर येऊ शकतात. ज्याचा आनंदाने स्विकार करा. आरोग्याकडे लक्ष द्या. 


मकर - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस महत्वातचचा आहे. कामाकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी करिअरकडे फोकस करावं. आजचा दिवस अविवाहितांसाठी खूप चांगला आहे. मनातील इच्छा बोलून दाखवण्यास हरकत नाही. 


कुंभ - जुन्या नात्यांमध्ये आज यश मिळू शकतं. लग्नाचा विचार करत असाल तर आजचा दिवस खास आहे. काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील. लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 


मीन - मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. ठरवलेली सगळी काम होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी दुखणी वर येतील. काम अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा दिवस कामात घालवाल.