मेष - नोकरदारवर्गाला अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. आज अधिक काम करावं लागू शकतं. पण काम करताना घाबरु नका. जोडीदाराचं प्रेम मिळेल. धनलाभाचा योग आहे. समस्या सोडवल्या जाऊ शकतात. चांगल्या संधी मिळू शकतात. तब्येतत सुधारणा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - राहिलेले पैसे मिळू शकतात. पैशांसंबंधी विचार करावा लागेल. घरातील मोठ्यांचं सहकार्य मिळेल. दिवस चांगला आहे. विचार करुन निर्णय घ्या. 


मिथुन - दुहेरी विचारांनी कामात मन लागणार नाही. खास प्रकरणांमध्ये विचार करणं कठीण होईल. काहीतरी चिंता राहील. वाद-विवादात पडू नका. कामात एकाग्रता नसल्याने कामाचा त्रास वाटेल. खर्च वाढू शकतो. मानसिक तणावात राहू शकता.


कर्क - वेळ, नशिबाची साथ मिळेल. कामात झालेल्या चुकीचा फायदा होऊ शकतो. नवीन काम करण्यास दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं.


सिंह - कामाच्या ठिकाणी शत्रूंवर मात कराल. नवीन काम मिळू शकतं. नोकरीत प्रगती होईल. केलेल्या कामातून धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून सुख आणि आर्थिक मदत मिळू शकते. पैसे आणि कुटुंबाबाबत तुमचे अंदाज खरे ठरतील.


कन्या - कामात वेळ जाईल. जोडीदारच तुमची मोठी ताकद बनेल. काम वाढेल. कामामुळे फायदा होईल. अविवाहितांना प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. 


तुळ - तब्येतीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वत:ला नियंत्रणात ठेवा. कामाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका. थकवा जाणवेल. आराम करा. 


वृश्चिक - अधिकारी खुश राहतील. त्यांचं सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल. आवडत्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो. तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.


धनु - कुटुंबाची मदत मिळेल. नवीन सुरुवात करु शकता. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. जोडीदाराबाबत भावुक असाल. जोडीदाराला खुश करण्यासाठी खर्च कराल. 


मकर - चांगल्या संधी मिळू शकतात. इतरांकडून तुमचं कौतुक होईल. धनलाभाची शक्यता आहे. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तब्येतीसाठी दिवस चांगला आहे.


कुंभ - मनोरंजनात्मक दिवस असेल. चांगली बातमी मिळू शकते. तब्येतीची काळजी घ्या. कामात प्रगती होईल. 


मीन - कामात किंवा कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. कामात मन लागेल. कामात गोंधळ वाढू शकतो. वाद होऊ शकतात. काही लोक तुमच्या कामाचं क्रेडिट घेऊ शकतात. तुमची स्थिती इतरांना सांगू नका. त्यामुळे फायदाच होईल.