COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- काही नवे अनुभव मिळतील स्वत:वर आणि येणाऱ्या वेळेवर विश्वास ठेवा. नशिबाने जे काही होईल ते तुमच्या हिताचच असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मोठ्या बदलासाठी तयार राहा. काही लोक तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवतील. गुंतवणूकीच्या बाबतीत नवे सल्ले मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता. प्रभावी व्यक्तिमत्वाच्या लोकांची भेट होण्याची शक्यता. दाम्पत्य जीवनात सुख. 


वृषभ- तुमच्यासाठी वेळ चांगला असेल. अचानक फायदा होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात रेंगाळलेली कामं पूर्ण होणार. साथीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. पैशांच्या बाबतीत नव्या योजना आखाल. नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कर्ज फेडण्याकडे तुमचा कल असेल. कुटुंबाला वेळ द्या. 


मिथुन- आज तुम्ही स्वत:च्या योजनेवर विश्वास ठेवा. अपेक्षा आहे त्या व्यक्ती तुम्हाला वेळ देतील. नवे लोक तुमच्याशी जोडले जातील. महत्त्वाच्या व्यक्तींसोबतचे संबंध सुधारणार. जास्तच क्लिष्ट गोष्टी, अडचणी समोर आल्या तर त्या टाळण्याचा प्रयत्न करा. भावंडांचं सहकार्य लाभेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल.



कर्क- मुलांकडून मदत मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात नशिबाच्या साथीने अनेक कामं पूर्ण होतील. पैसे किंवा रोजगाराच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. नात्यांच्या बाबतीत काही नवे अनुभव मिळतील. जुने वाद विसरण्याचा प्रयत्न करा. स्वत:वर विश्वास ठेवा. प्रवास दौऱ्यांचे बेत आखले जातील. जवळच्या लोकांसोबतची नाती दृढ होतील.


सिंह- आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतील. नव्या लोकांशी मैत्री आणि संपर्क होतील. तुम्ही स्वत:ची वेगळी ओळख बनवाल. व्यवसायासाठी चांगला दिवस. महत्त्वाच्या कामांवर जास्त लक्ष द्या. इतरांची मदत करा. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील. काहीतरी वेगळं काम करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 


कन्या- पैशांच्या जुन्या व्यवहाराविषयी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. मनात जे काही प्रश्न आहेत त्यांच्याविषयी इतरांकडून सल्ले मिळतील. खूप खोलात गेल्याने विषय समजून घ्याल. भविष्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलाल. तुमच्याकडून इतरांना मदतीची अपेक्षा असेल. ज्येष्ठ व्यक्तीची मदत कराल. जमीन जागेच्या कामांमध्ये फायदा होईल.


तुळ-  कोणत्यातरी गोष्टीप्रती उत्सूक राहाल. नवे अनुभव मिळतील. चांगल्या बोलण्याने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वपूर्ण बोलणी आणि मुलाखती यशस्वी होतील. प्रवास दौऱ्यांचे बेत आखाल. जुने मित्र आणि नातेवाईकांशी भेट होईल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. राशीमध्ये चंद्र असल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होतील. धैर्याने पावलं उचला. धार्मिक कामांमध्ये तुमची आवड वाढेल.


वृश्चिक- सुखद आणि आनंददायक असा दिवस राहील. तुम्ही स्वत:मध्ये काही बदल करु शकाल. महत्त्वाच्या कामांसाठी विश्वासार्ह व्यक्तींकडून मदत मिळेल. महत्त्वाचे सल्ले मिळतील, त्यांवर चर्चा करण्याविषयी सुधरणांवर भर द्या. तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतील. नवी माहिती तुम्हाला प्रोत्साहित करेल. सकारात्मक दृष्टीकोन राहिल.  


धनू- विचार केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. ताऱ्यांची स्थिती पाहता दिवस महत्त्वपूर्ण असेल. करिअरमध्ये पुढे जाल, योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये चांगले बदल होणार. पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारेल. बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. 


मकर- आज मानसिक आणि शारिरिक बाबतीत थकवा जाणवेल. तुमच्या कामापासून मागे हटू नका. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवाल. कामाचा व्याप वाढेल. परिणाम तुमच्या बाजूने असतील. दिवसभरात उत्साही राहाल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. धनलाभ होण्याची संधी. कुटुंबाची मदत होण्याची चिन्हं. 


कुंभ- कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुमच्यातील सकारात्मक शक्तीने खूप काही मिळवू शकाल. नव्या जबाबदाऱ्या हाती येतील. कठिण परिस्थितीत तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळेल. घर बदलण्याची इच्छा होईल. जमीन, संपत्तीविषयी महत्त्वाचे निर्णय होतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. 


मीन- करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. कामकाज आणि व्यवसायावर लक्ष केंद्रीत कराल. काही नवं करण्याचा मनसुबा असेल. कुटुंबाची मदत होईल. कुटुंबाच्या कलाने घ्या फायदा होईल. मन आणि बुद्धीवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल.