`या` राशीच्या लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
कसा असेल आजचा आपला दिवस? कोणत्या राशीला करावा लागेल समस्यांचा सामना
मुंबई: दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना किंवा चाहूल आधीच लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. त्यासाठीच जाणून घेऊया कसा असेल 5 मार्चचा आजचा दिवस.
मेष- खूप जास्त मानसिक ताण आपल्या येणाऱ्या थकव्याचं कारण असू शकतो. आरोग्याची काळजी घेण्यावर भर द्या. आज आपल्या भावंडांकडून आर्थिक मदत मिळू शकते.
वृषभ- आपल्या प्रिय व्यक्ती किंवा जोडीदारासोबत आजची संध्याकाळ खूप सुंदर असेल. वेळ वाया घालवू नका त्याचं योग्य नियोजन करा.
मिथुन- फिरणे, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानं आपला मूड खूप चांगला होईल. घरातील व्यक्ती आपल्या व्यवहारात अडथळा बनतील.
कर्क- आपल्याला दिलेला सल्ला ज्येष्ठांचं मत आज नक्की ऐका. त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. आज आपल्या प्रेमाच्या आड कोणीतरी तिसरं येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बॉसची कुरकुर ऐकावी लागले.
सिंह- कोणालाही पैसे देणं टाळा. त्यामुळे तुमच्याकडील पैशांचं मूल्य कमी होईल. कुटुंबातील मतभेदांचा परिणाम आपल्यावर होणार आहे. प्रिय व्यक्तीची आठवण येईल.
कन्या- आपल्या मनमानी कारभाराचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
तुळ- आज आपलं आरोग्य चांगलं असेल पण प्रवास कंटाळवाणा असणार आहे. कुटुंबात आपलं वर्चस्व कायम राहिल. मित्रांसोबत आज आपला वेळ खूप चांगला जाईल.
वृश्चिक- दु:खानंतर येणाऱ्या सुखाची किंमत अधिक जास्त चांगली कळते. भविष्यातील योजना गुप्त ठेवा. आजची संध्याकाळ खूप चांगली आणि आनंद देणारी असेल.
धनु- आपला आनंद दुसऱ्यांसोबत वाटल्यानं तो वाढेल. घर-कुटुंबाकडे लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जोडीदार तणावाखाली असल्यानं त्याचा परिणाम आपल्यावर होईल.
मकर- बेरोजगार लोकांना आज नव्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आणि आनंद देणारा आहे.
कुंभ- व्यस्त दिवस असूनही आपलं आरोग्य उत्तम राहिल. आज आपण प्रेमात पडू शकता. कामाच्या ठिकाणी 100 टक्के आपलं काम नीट करण्यावर भर द्या फळ नक्की मिळेल. जोडीदारासोबत दिवस उत्तम जाईल.
मीन- आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या. न बोलवूनही येणाऱ्या पाहुण्यांमुळे डोकेदुखी वाढेल मात्र आर्थिक फायदा देखील होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.