Horoscope : ऑक्टोबर महिन्यात 5 राशींच्या लोकांची होणार आर्थिक भरभराट, प्रमोशन मिळण्याची शक्यता
ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा असणार? कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावध राहावं लागणार...
मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीकधी अनेक संकटं आणि समस्यांचा सामना केल्यानंतर सुखाचे दिवस यावे यासाठी सर्वजण त्या दिवसांची आतूरतेनं वाट पाहात असतात. ऑक्टोबर महिना हा 5 राशींसाठी खूपच आनंद देणारा असणार आहे. ज्योतिषी बेजान दारुवालाचा मुलगा ज्योतिषी चिराग दारूवालाच्या मते, ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घ्या?
मेष: कुटुंबाला सुख मिळेल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळेल. तब्येत सुधारेल आणि मित्र-परिवारासोबत भेटीगाठी होतील. संकटात मित्रांची साथ
मिळेल.
वृषभ: कोर्टाच्या व्यवहारांमध्ये आपली बाजू भक्कम राहिल्याने विजय होईल. व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक आणि मानसिक मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता.
मिथुन: तुम्हाला पाण्यात पाहणाऱ्यांचा पराभव होईल. अप्रत्यक्षपणे आपला फायदा होईल. हा महिना आरोग्यासाठी चांगला आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. जनतेशी व्यवहार वेळेवर झाल्याचा आनंद होईल.
कर्क: ऑक्टोबर महिना व्यवसायासाठी खूप चांगला आहे. कर्मचारी वर्गासाठी देखील हा महिना उत्तम राहील. अधिकारीही तुमच्यावर खूश होतील. हा महिना कुटुंबासाठीही चांगला आहे. मात्र, जास्त काम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सिंह: या महिन्यात कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचा योग येईल. ज्या दरम्यान तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आत्मनिरीक्षण करण्याची संधी मिळेल.
कन्या: आर्थिक चणचण दूर होईल. मदत मिळाल्याने आनंद होईल. ऑक्टोबर महिना या राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी चांगला राहणार आहे. तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील.
तुळ: व्यवसायात यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. शेतकरी कामगार वर्गासाठी हा महिना संमिश्र असेल. आर्थिक स्थिती बिघडणार नाही याची आधीच काळजी घ्या. पार्टनरची मदत मिळेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: ऑक्टोबर महिन्यात पुत्रप्राप्तीचा योग आहे. व्यवसाय देखील अति नाही पण चांगला राहील. आई-वडिलांचं आरोग्य सुधारेल.
धनु: मनोरंजनावर जास्त खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगलं राहील. व्यवसायात वृद्धी होईल.
मकर: कुटुंबात शुभ कार्यामुळे घरात आनंद येईल. घर आणि जमीन संबंधित प्रकरण तुमच्या बाजूने असेल. नशिबाने सर्व कामे होतील. या महिन्यात तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता.
कुंभ: या महिन्यांत शिफ्टिंगमध्ये वेळ जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुकसान सहन करण्याची ताकद ठेवा. नोकरीमध्ये फायदा होईल. नातेवाईकांसोबत कुरबुर होऊ शकते.
मीन: या महिन्यात तुम्ही थोडी चतुराई दाखवली तर तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. या महिन्यात रुग्णालयात जावं लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फायदा होईल.