मेष: जानेवारी महिन्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. सूर्य कुंडलीच्या नवव्या स्थानावर असल्याने या राशीला अनेक समस्यांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला खूप तोंड द्यावं लागेल. मार्च आणि एप्रिल महिना देखील थोडा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ: या राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना थोडा कष्टाचा असणार आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर महिना अशुभ असणार आहे. सूर्याच्या बदलत्या स्थितीमुळे हा बदल होण्याची शक्यता आहे. 


मिथुन: जानेवारी महिन्यात आपल्याला खूप समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासोबत फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात खूप सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सतर्क राहाणं आवश्यक आहे. 


कर्क: 2022 मधील फेब्रुवारी महिना अधिक कठीण असणार आहे. वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. जून आणि डिसेंबर महिन्यात अडचणी येऊ शकतात. 


सिंह: जुलै आणि मार्च महिना या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ असणार आहे. 


कन्या:  फेब्रुवारी महिन्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या महिन्यात अधिक खर्च होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अडचणींचा सामना करावा लागेल. 


तुळ: नोकरी बदलण्याचा योग आहे. मे महिना आणि सप्टेंबर महिन्यात आर्थिक अडणींचा सामना करावा लागणार आहे. 


वृश्चिक: एप्रिल महिन्याचा काळ सर्वात कठीण आहे. वैवाहिक जीवनात अनेक अडचणी जाणवतील. जून आणि ऑक्टोबर महिन्यात सावध राहण्याची गरज आहे. 


धनु: मे, जुलै आणि नोव्हेंबर महिना आपल्यासाठी वाईट असणार आहे. या महिन्यात तुम्हाला भाग्याची साथ मिळणार नाही. 


मकर: जून महिना या राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्या सतर्क राहावं लागू शकतं. 


कुंभ: जुलै महिन्यात जास्त आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. रिलेशनशिपमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेजारच्या व्यक्तींसोबत वाद होण्याची शक्यता आहे. 


मीन: फेब्रुवारी आणि ऑक्टोबर महिन्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मन निराश आणि उदास होऊ शकतं. धीर धरा सगळ्या गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे.