Horoscope 16 फेब्रुवारी 2022 : धकाधकीच्या या जीवनात आपण एक गोष्ट पाहायला आणि जाणून घ्यायला विसरत नाही. ही गोष्ट असते ती म्हणजे आपल्या भविष्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा दिवस आपल्याला कसा जाईल, हे जाणून घेण्यासाठी पाहा आजचं राशीभविष्य 


मेष (Aries): सामाजिक कार्य करण्यामध्ये तुमचं मन रमेल. आखलेल्या योजना पूर्णत्वास जातील. नोकरीत अधिकाराच्या शब्दाला मान मिळेल. सन्मान मिळेल. 


वृषभ (Taurus): एखादी इजा, आजार दूर होईल. आज धार्मिक कार्यांमध्ये मन रमेल. राजकीय अडीअडचणी दूर जातील. कुटुंबात मन रमेल. 


मिथुन (Gemini): आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या सहलीचा किंवा नातेवाईकांकडे जाण्याचा बेत आखू शकता. हा वेळ आनंदात व्यतीत होईल. आवडीच्या खाण्यावर ताव मारता येणार आहे. नोकरीत यश मिळेल. 


कर्क (Cancer): आरोग्याची काळजी घ्या. एखादी वाईट वार्ता मिळू शकते. धावपळ वाढेल. कोणाशीही बोलताना अतीरुक्षपणे बोलू नका. महागड्या वस्तू सांभाळा. 


सिंह (Leo): वरिष्ठांची मदत मिळणार आहे. भाग्योदयासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. शारीरिक कष्ट करावे लागतील, पण त्याचं फळही मिळेल. 


कन्या (Virgo): समाजोपयोगी कामांमध्ये मन रमेल. गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. शत्रुपासून सावध राहा. 


तुला (Libra): एखादी इजा किंवा दुर्घटनेपासून सावध रहा. एखादा नवा त्रा होईल, कोणा एका व्यक्तीशी वाद संभवतो. तुमच्या स्वाभिमानाला इजा पोहोचेल अशी एखादी घटना घडू शकते. 


वृश्चिक (Scorpio): अवाजवी खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. भावंडांची मदत मिळेल. तुम्हाला व्यवहारांतून यश मिळेल. 


धनु (Sagittarius): बुधवारी होणारा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. बुडालेले, गमावलेले पैसे परत मिळतील. घाईघाईत कोणतंही काम करु नका. नव्या उपक्रमांना हजेरी लावा. 


मकर (Capricorn): आजच्या दिवशी वाईट प्रवृत्ती असणाऱ्यांपासून दूर राहा. कोणाचीही चुकीच्या पद्धतीने थट्टा केली जाणार नाही, याची काळजी घ्या. 


कुंभ (Aquarius): आज तुम्हाला अनेकांची मदत मिळणार आहे. चांगल्या कामांमध्ये अनेकांची साथ मिळणार आहे. घरात शांतता असेल. नको त्या वादात अडकू नका. 


मीन (Pisces): बेरोजगारीचे प्रश्न दूर होतील. अनेकांची भेट घेण्याची संधी मिळेल. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्तानं एखादा प्रवास होऊ शकतो. मोठं होण्याची संधी आहे, फक्त घाई करु नका.