Horoscope 2 August 2022 : आजचा नागपंचमीचा दिवस कन्या राशीसाठी महत्त्वाचा; पाहा काय सांगतेय तुमची रास
कोणी राहायचंय सावध?
मेष- तर्कवितर्कांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा पाहू नका. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
वृषभ- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे.
मिथुन- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेण्यामध्ये घाई करू नका. वेळेला महत्त्व द्या.
कर्क- सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा.
सिंह - कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
तुळ- शुभकार्यांसाठी खर्च कराल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणार असेल. पैशांच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. तुमची मूल्य सोडू नका.
वृश्चिक- अडकलेली आर्थिक कामं मार्गी लावा. विचारपूर्वक कामं करा. करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. फक्त अतिविचार टाळा.
धनू- सुखसंपत्तीनं घरात आनंदाची बरसात होणार आहे. सर्वजण तुमचं समर्थन करणार आहेत. आर्थिक विषयांवर भर द्या.
मकर - दीर्घकालीन कामं पूर्ण करा. आज अडकलेली कामं मार्गी लागतील. अनेक विषय तुम्ही चपळाईनं हाताळाल. कार्यक्षमता वाढेल.
कुंभ - कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या आनंदानं आज तुम्हाला सुखानुभव मिळणार आहे. आपल्या माणसांच्या शिकवणुकीतून पुढे जा.
मीन- देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. विचारांनी आज तुम्ही प्रगल्भ व्हाल असे प्रसंग निर्माण होणार आहे. धनलाभाचा योग आहे.