Monthly Horoscope December 2022 : 2022 या वर्षातील  वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. डिसेंबरमध्ये अनेक महत्त्वाचे ग्रह बदल होणार आहेत. काही ग्रह गोचर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राशी बदलण्यामुळे काही राशींच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होईल. काही राशीच्या लोकांनी या महिन्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे नुकसान टाळता येईल. 


डिसेंबरमध्ये काळजी घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन : या राशींच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. परंतु कामाच्या ठिकाणी परिस्थिती फारच प्रतिकूल असू शकते. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जात आहेत. संयम बाळगणे आणि थोडा वेळ जाऊ देणे तुमच्यासाठी चांगला असणार आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. (अधिक वाचा - Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस)


कर्क : डिसेंबर महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. निष्काळजी राहू नका. महिन्याचा शेवट समाधानाने भरलेला असेल. प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. दु:खाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात काही कारणाने तणावाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. निद्रानाशाची समस्या असू शकते. आरोग्याची काळजी घ्या. 


कन्या : हा महिना काळजी करायला लावणार आहे. मात्र, कोणत्याही अफवेनंतर तुमच्या मनात कालवाकालव होऊ शकते. अशावेळी तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. अनावश्यक तणाव आणि चिंता तुम्हाला घेरतील, तर महिन्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, या महिन्यात प्रवास टाळणे चांगले. 


मकर: या राशीच्या लोकांना सावध राहला पाहिजे. तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळवून तुमचे नुकसान करु शकतात. विरोधकांकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले. कुटुंबातही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या.


धनु: या राशींच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर चालू असलेले काम बिघडू शकते. खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बजेटवर लक्ष केंद्रीत करा. अन्यथा ते कोलमडण्याची शक्यता आहे. प्रवास टाळणे चांगले.