मुंबई: नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. याच नवरात्रोत्सव देशात वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा भक्तीभावाने केली जाते. या निमित्ताने कोणत्या राशींवर माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवरात्र उत्सवात जास्त सावध राहावं लागणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: या राशीच्या लोकांसाठी नवरात्र खूप चांगली आहे. या काळात आपलं मनावर नियंत्रण असणं खूप गरजेचं ठरणार आहे. जे निर्णय महत्त्वाचे आहेत ते आपण गंभीरपणे घेऊ शकता. विवाह योग्य तरुणींनी मातेची पूजा करावी त्यांना चांगला फायदा होईल. 


वृषभ: अडकलेली कामं नवरात्रीमध्ये पूर्ण होईल. महिलांसाठी करियरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. नव्या संधी मिळतील. 


मिथुन: कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. गाडी खरेदीसाठी उत्तम योग आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर चांगली राहणार आहे. शुभ कार्य, मंगल कार्यामध्ये आपला सहभाग असेल. 


कर्क: कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करा. कर्क राशीच्या लोकांना आपल्या मेहनतीचं फळ चांगलं मिळेल. जीवनसाथी किंवा पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम वेळ आहे.


सिंह: आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये चांगले दिवस येतील. 


कन्या:  या राशीच्या लोकांना भविष्याची चिंता असणार आहे. नवरात्रीमध्ये आपल्या सगळ्या चिंता दूर होतील. आपल्याला चॅलेंजिंग सल्ले मिळू शकतात. 


तुळ: नवरात्रीमध्ये परिस्थिती सुधारेल. उपवास केल्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आपल्याला भितीपासून मुक्तता मिळेल. 


वृश्चिक: या राशीच्या लोकांचा त्रास नवरात्रीमध्ये दूर होईल. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. सकारात्मकता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करण्याची संधी.


धनु: करियर ग्राफ उत्तम राहील. आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीमध्ये थोडी ग़डबड होण्याची शक्यता आहे काळजी घ्या. 


मकर: नवरात्रीमध्ये आपल्याला मोठं यश मिळू शकतं. घरात पूजा करण्याने फायदा होईल. आपल्या आयुष्यात सकारात्मक वातावरण राहील. 


कुंभ: मान-सन्मान मिळेल. प्रवासाचे संकेत आहेत मात्र काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपली स्तुती होईल. 


मीन: आपल्याला हवे तसे बदल होतील. जुन्या मित्र-परिवाराच्या भेटीगाठी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.