या आठवड्यात 3 राशीच्या लोकांची होणार चांदी, जाणून घ्या कोणाचं नशीब उजळणार
येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या Weekly Horoscope for December
मुंबई : या वर्षातील शेवटचे दोन आठवडे उरले आहेत. सरत्या वर्षातून काहीतरी चांगलं मिळावं, अशीही लोकांची इच्छा आहे. यापैकी काही लोकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी 13 डिसेंबर 2021 ते 19 डिसेंबर 2021 पर्यंत कालावधी कसा असणार, खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा अॅस्ट्रो मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया.
मेष : या आठवड्यात तुमची मेहनत आणि नशिबाची साथ उत्तम देईल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांना मदत कराल पण तुमच्या मदतीसाठी कोणीही पुढे येणार नाही.
वृषभ : या आठवड्यात तुमची धर्मावरील श्रद्धा वाढू शकते. पैशाशी संबंधित बाबींमध्ये शुभ प्रभाव राहील. या आठवड्यात, ओळखीच्या व्यक्तीला दीर्घ काळानंतर भेटण्याची शक्यता आहे.
मिथुन : आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात मतभेद दिसून येतील. या आठवड्यात मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
कर्क: तुमच्या कौटुंबिक आनंदात वाढ होईल आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि साथ मिळेल. सरकारी क्षेत्रात लाभ मिळतील. या आठवड्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह: कौटुंबिक मालमत्ता आणि संपत्तीच्या क्षेत्रात काही प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला प्रभाव राहील. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
कन्या : या आठवड्यात तुम्हाला मनःशांती मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात सर्वात जास्त वेळ प्रवासात जाईल.
तुळ : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला जाणार आहे. प्रवासाचीही संधी मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे संकेत आहेत. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल.
वृश्चिक : या आठवड्यात आनंदाचं वातावरण असणार आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी चांगला राहील. मन प्रसन्न राहणार आहे.
धनु : या आठवड्यात वैवाहिक जीवन आनंदी राहील. बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यश मिळेल.
मकर : व्यवसायाच्या क्षेत्रात लाभाची स्थिती आहे. तुमच्यासाठी चांगली बातमी येईल आणि तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
कुंभ : हा आठवडा संमिश्र आणि फलदायी राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल.
मीन : अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वरिष्ठांशी संबंध चांगले राहातील.