Horoscope 13 June : `या` राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा
Horoscope 13 June : `या` राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा
मुंबई : वृश्चिक राशीच्या लोकांनी सोमवारी आपल्या बॉसशी वाद घालू नये, धनु राशीच्या लोकांची नोकरी धोक्यात आहे, त्यामुळे योग्य ते काम करा, कुंभ राशीच्या लोकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो तर मीन राशीच्या लोकांनी गोंधळून जाऊ नये.
मेष - या राशीच्या लोकांच्या कार्यालयात काही वाद असेल तर ते पुढे जाऊ देऊ नका, मात्र टीमसोबत प्रेम आणि सामंजस्याने काम करावे लागेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व देणं योग्य नाही, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायलाही शिका, आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.
वृषभ- या राशीच्या लोकांना ऑफिसमधील वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे ते ऑफिसची कामे अधिक सहजतेने करू शकतील. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. ज्याचा ते खूप दिवसांपासून विचार करत होते.
तरुणांनी चांगले आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे, गरज पडल्यास पैसे खर्च करावे लागतील पण अनावश्यक खर्च करू नये. पोटाशी संबंधित आजारांपासून सावध राहा.
मिथुन - करिअरशी संबंधित सध्या सुरू असलेल्या समस्या आता दूर होताना दिसत आहेत, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन आणि सर्जनशील करायचे असेल तर सध्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
कर्क - व्यावसायात जपून पैसे खर्च करा. नाहीतर आज आर्थिक चणचण जाणवू शकते. तरुणांची द्विधा मनस्थिती असणार आहे. आरोग्याच्या समस्या जाणवतील. पाठ आणि कंबरेतही वेदना होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा आणि काळजी घ्या.
सिंह - आज जास्त काम करावं लागू शकतं. नियोजनाचा अभाव असल्यास समस्यांचा सामना करावा लागेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.या राशीच्या वृद्धांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतील.
कन्या- आज वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर काळजीपूर्वक काम करा. छोट्या-छोट्या समस्यांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. आज नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल.
तुळ - या राशीच्या लोकांनी घाईघाईने कामं करू नका. व्यवसायात आव्हाने येत राहतात, व्यावसायिकांना आज आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात भांडण झाले की मन अस्वस्थ करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक- बॉसबद्दलची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यावी. तुमचे मत व्यक्त करण्यात काही नुकसान नाही पण बॉसच्या विरोधात जाऊ नका. भूतकाळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर बारीक नजर ठेवा, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहिल. तुमच्या मनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका, नेहमी सकारात्मक राहा.
धनु - नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी हयगय करू नये, त्यामुळे तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. व्यापारी वर्गासाठी उधारी महागात पडू शकते. पैसे अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवहार करताना जपून करा. कुटुंबातील वातावरण चांगलं राहिल. मित्र-कुटुंबाची मदत अडीअडचणीच्यावेळी होईल.
मकर- गरजूंची मदत कराल, व्यवसाय सावधगिरीने करावा. कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर सह्या करायच्या असतील तर घाई करू नका. आधी त्याचे नियम व अटी वाचा. वेळेची किंमत ओळखा आज वेळ वाया घालवणं महागात पडू शकतं. कामासोबत आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ- या राशीच्या लोकांच्या ऑफिसमध्ये अनेक लोकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. नवीन प्रयोग करत राहा. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबातील अडलेली कामं आज पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा.
मीन - या राशीच्या लोकांची द्विधा मनस्थिती राहिल, पण संभ्रमाची परिस्थिती टाळावी.काम नीट समजून घ्या आणि करा नाहीतर नुकसान होईल.आज आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आहाराकडे आज लक्ष द्या.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )