मेष : दाम्पत्यांच्या आयुष्यात आनंद येईल. घरातील मोठ्यांचा सन्मान करा. कोणताही निर्णय घेण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ:  नात्यात नाराजी किंवा वाद होणार नाही याकडे लक्ष द्या. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांच्या निर्णयाचा सन्मान करा. येत्या काळात याच गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. 


मिथुन : घरी लवकर पोहोचा. आईसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू नका. नोकरीत बदल करण्याच्या विचारात असाल तर, निर्णय घेताना विचार नक्की करा. आरोग्याची काळजी घ्या. 


कर्क : प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. कोणतही महत्त्वाचं काम करताना हलगरजीपणा करु नका. मित्रांची मदत करा. 


सिंह : घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. 


कन्या : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे. 



तूळ: नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. मकर राशीचे लोक यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. योग्य दिशेने केलेले प्रयत्न अनुकूल परिणाम देतील.


वृश्चिक : नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा.   तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.  


धनु :  या राशीच्या लोकांनी असे काहीही करू नये ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. त्यांना त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. अखेर मेहनतीचं फळ नक्की मिळेल. 


मकर : तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. येणारा काळ उत्तम असणार आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. 


कुंभ : काम मन लाऊन करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका.


मीन : या राशीचे लोक जे लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये आहेत ते लग्न करण्याचा विचार करतील. व्यावसायिकांना मोठे कंत्राट मिळू शकते. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना आधी वरिष्ठांचा सल्ला घ्या . यश प्राप्तीचे योग आहेत.