मेष - मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरूवात आणि विचार केलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. आजचा दिवस कुटुंब, वैयक्तिक गोष्टी आणि पैशांसंबंधी यात व्यतीत होईल. महत्त्वाच्या कामांचं नियोजन होऊ शकतं. तुमच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीची काळजी घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - नोकरीत चढ-उतार जाणवतील.  कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या.  विचार करून बोला. दुसऱ्याचं बोलणं ऐकण्याकडेही लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. तब्येत ठीक राहील. चांगलं जेवण होऊ शकतं.


मिथुन - कुटुंबातील समस्या कमी होतील. नवं वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. महत्त्वपूर्ण कामात यश मिळेल. नवीन ऑफर मिळू शकते. दररोजची कामं करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कामं लवकर पूर्ण होतील. पुढे जाण्याची संधी आहे. महत्त्वाच्या मिटिंग आणि कामं करण्यासाठी दिवस शुभ आहे. समस्या संपतील.


कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीत बेजबाबदारपणा करू नका. नोकरी, व्यवसायात घाई-गडबड करू नका. विचार केलेल्या कामांसाठी वेळ जाऊ शकतो. त्या कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. 


सिंह - अडकलेले पैसे परत मिळतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. कुटुंबात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे.  कटू बोलणं टाळा. कोणतीही योजना आज करू नका, जुनी कामं उरकण्याचा प्रयत्न करा. कामात मन न लागल्याने अडचणी येऊ शकतात. तब्येत चांगली राहील.


कन्या - व्यवसायात काही नवीन काम सुरू होऊ शकते. जोडीदाराची साथ आणि सुख मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. कामं पूर्ण होतील. काही महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. अचानक काही मार्ग विचारात येऊ शकतात. कामावर लक्ष द्या. तब्येत ठीक राहील. प्रसन्न वाटेल.


तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत कामं पूर्ण करू शकता. कामात मन लागेल. आज काही चांगल्या संधी मिळू शकतात. त्याचा फायदा करून घ्या. अचानक काही विचार मनात येतील. जोडीदारासोबत संबंधांत अनुकूलता राहील. तब्येत चांगली राहील. 


वृश्चिक - नोकरी, व्यवसायात काही निर्णय घ्यावे लागू शकतात. गोंधळ होईल. एखादे नुकसान होऊ शकते. वायफळ खर्च होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी समस्या किंवा असुविधा होऊ शकते. काही समस्या असल्याचा ती सावधतेने सोडवा. त्रासदायक लोक आजूबाजूलाच राहतील. तब्येतीत चढ-उतार होतील. काळजी घ्या.


धनु - आर्थिक परिस्थितीत सुधार होईल. समजदारी आणि नम्रतेने गोंधळलेल्या परिस्थितीचा सामना करू शकता. दैनंदिन कामातून धनलाभ होऊ शकतो. कर्ज घेण्याचा विचार कराल. समस्या संपतील. मुलांकडून मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. नोकरी, व्यवसायातील समस्या दूर होतील. 


मकर - सावध राहा. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. मनातील विचारांमुळे गोंधळ उडेल. जुन्या गोष्टीत अडकून राहाल. समस्यांचे निराकरण लगेच होणार नाही. काही विषेश कामं अर्धवट राहतील. कामात मन लागणार नाही. 


कुंभ - कामातील समस्या दूर होतील. योजना सफल होतील. पुढील कामांसाठी योजना आखल्या जातील. रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. समस्या संपतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सांभाळून राहा. 


मीन - व्यवासायात काही नवं करण्याच्या नादात समस्या वाढू शकते. मनातील विचारांमुळे कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करू नका. काही गोष्टींचे टेंन्शन राहील. तब्येतीसाठी दिवस चांगला नाही. वेळेवर जेवण करा.