मेष- अडकलेली कामं  पूर्ण होतील. तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न कराल. दिवस उत्साही असेल. वैवाहिक जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुने आजार दूर होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- कामकाजात व्यग्र असाल. मेहनतीने जास्त अर्थार्जनाची संधी आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. वेळ चांगली आहे. पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रवासयोग आहेत. 


मिथुन- घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थितीतीविषयी चिंता करु नका. मित्र आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यातच जास्त वेळ जाईल. पोटाचे विकार उदभवतील. 


कर्क- नोकरीत काही अडचणी येतील. दैनंदिन कामातही अडथळे येतील. जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. डोकेदुखी सतावेल. 


सिंह- कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या निमित्ताने नवे करार कराल. कोणा एका दूरच्या गोष्टीवर लक्ष असेल. सहकाऱ्यांकडे आकर्षित व्हाल. 


कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्ठांचा सहयोग मिळेल. अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करा, नाहीतर काही अडचणी उदभवतील. 


तुळ- नोकरी आणि व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. इतरांची मर्जी राखून चतुराईने काम करा. 


वृश्चिक- व्यापारात तुलनेने फायदा कमीच होईल. बदलीचे योग आहेत. वायफळ कामांमध्ये लक्ष द्याल. अविवाहितांसाठी तणावाचा दिवस आहे. 


धनु- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल.  जेवणात सावधगिरी बाळगा. 


मकर- आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. पैसे अडकतील. मनाविरुद्ध काही खर्च करावे लागतील. कामाचा व्याप वाढेल. 


कुंभ- आर्थिक चणचण संपेल. सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. आर्थिक तंगी संपेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांनी काही अडचणी दूर होतील. 


मीन- व्यापार विस्तारीकरणाचा विचार केला नाहीत तर फायद्याचं ठरेल. सावध रहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.