मुंबई : काही लोक तळहातावर बनवलेल्या रेषांना सामान्य मानून दुर्लक्ष करतात, तर बरेच लोक त्यांना त्यांच्या नशीबाशी जोडून पाहतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की हस्तरेखांना हस्तरेखाशास्त्रात अतिशय खास मानले जातात. हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावर असलेल्या वेगवेगळ्या भागावरील हे चिन्ह व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम करतात. असेच एक चिन्ह आहे X चे. व्यक्तीच्या जीवनात या चिन्हाचा अर्थ काय आहे, हे हाताच्या कोणत्या भागावर चिन्ह आहे यावर अवलंबून आहे.


X चिन्हाचा किस्मत कनेक्शन काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे मानले जाते की, ज्या व्यक्तीच्या हातात X चे चिन्ह आहे तो एक अतिशय ज्ञानी व्यक्ती, एक मोठा नेता किंवा काही महान कार्य करणारी व्यक्ती असतो. एवढेच नाही तर या लोकांचे सहा इंद्रिये देखील मजबूत असतात आणि नेहमी इतरांसाठी ते प्रेरणा बनतात. अशा लोकांच्या आजूबाजूला वेगळ्याच प्रकारची ऊर्जा असते, ज्यामुळे त्यांना नेहमी इतरांमध्ये विशेष स्थान मिळते.


आपला तळहाता तपासा


तर्जनीच्या खाली असलेल्या स्थानाला गुरु पर्वत म्हणतात. गुरु पर्वतावर X मार्क असणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, ते चिन्ह हाताच्या या भागावर असणारी व्यक्ती खूप बुद्धिमान असते आणि ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप प्रगती करतो.


या ठिकाणी X मार्क असणे अशुभ


राहु आणि केतू हे पर्वत तळहाताच्या मध्यभागी असतात. केतू पर्वतावर X मार्क असणे चांगले मानले जात नाही. असे मानले जाते की, यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या तारुण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा व्यक्तीच्या लग्नातही अडचणी येतात. तसेच, त्यांना पैसे कमवण्यात देखील अडथळ्यांना सामोरे जावे लागते.


अशा लोकांनी सावधगिरी बाळगा


मधल्या बोटाच्या खाली असलेली जागा शनि पर्वताची आहे. काही लोकांच्या हातावर शनी पर्वतावर X चिन्ह असते. हस्तरेखाशास्त्रानुसार, अशा लोकांनी वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी. असे मानले जाते की, असे लोक अनेकदा अपघातांना बळी पडतात.


या बोटांच्या खाली X


रिंग म्हणजेच मरंगळीच्या खालच्या जागी सूर्य पर्वत आहे. सूर्याच्या पर्वतावर एक्स मार्क असल्याने, कला, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.


अशा लोकांना अप्रामाणिक मानले जाते


करंगळीच्या खाली असलेली जागा बुध पर्वत आहे. ज्यांच्या तळहातावर बुधच्या पर्वतावर X चे चिन्ह आहे, त्यांना अप्रामाणिक प्रवृत्तीचे मानले जाते. अशा लोकांना सावध राहण्यास सांगितले जाते.