Diwali 2022: दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शुभ सण आहे.  दिवाळीच्या काही दिवस आधी लोकं आपली घरे आणि दुकाने स्वच्छ करून घेतात. अनेक घरांमध्ये वर्षातून एकदाच संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. यासाठी सगळ्यांनाच सहभागी व्हावं लागतं. पण साफसफाई करताना काही जुन्या वस्तू फेकण्याऐवजी सांभाळून ठेवतो. पण त्यापैकी काही वस्तूंध्ये नकारात्मक उर्जा असते. त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवण्याऐवजी फेकून देणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता केल्यास घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साफसफाईचं असं नियोजन करा


-आपल्या घरातील प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातील वस्तूंचा अंदाज घ्या. कोणत्या दिवशी कोणती खोली साफ करायची ठरवा. त्यानुसार वस्तूंची आवराआवर करा. व्हॅक्युम क्लिनर, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करुन ठेवा.


-साफसफाई करताना लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना दुसऱ्या खोलीत बसवा. धुळीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो.


-साफसफाई करताना आधी वरच्या बाजूने सुरुवात करा. काचेच्या वस्तू, टीव्ही, मौल्यवान वस्तू झाकून ठेवा. पंखा, जळमटं साफ करून घ्या.


-दारे-खिडक्या पुसताना पाण्यात किंवा कपड्यावर थोडे व्हीनेगर घ्या.  काचा आणि दरवाजे स्वच्छ होण्यास मदत होईल.


या वस्तू दुरूस्त करा किंवा फेकून द्या


  • तुटलेला आरसा- वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा नकारात्मक उर्जा पसरवतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे साफसफाई करताना तुटलेला आरसा दिसल्यास फेकून द्या.

  • तुटलेला पलंग- घरात तुटलेला पलंग असल्यास एक तर व्यवस्थितरित्या दुरूस्त करून घ्या किंवा नवीन घ्या. जीवनात सुख-शांतीसाठी पलंग व्यवस्थित असायला हवा. 

  • बंद घड्याळ- घरात बंद घड्याळ असेल तर ते दुरूस्त करून घ्या अन्यथा प्रगतीत अडथळे येतात. बंद घड्याळ नुकसानदायक असते. त्याने नकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो.

  • तुटलेली फोटो फ्रेम- घरात तुटलेली फोटो फ्रेम असेल तर ती फेकून द्या किंवा व्यवस्थित करून घ्या. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली फोटो फ्रेम वास्तुदोष निर्माण करते. 

  • घराचा मुख्य दरवाजा- वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित असणं आवश्यक आहे. अन्यथा घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो.