Surya Abhishek Of Ramlala Video : जगभरात रामनवमीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. रामजन्मभूमी अयोध्येत यंदाचा सोहळा अतिशय खास असणार आहे. सन 1528 राम मंदिर पाडून मशिदीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यामुळे यंदा अयोध्येत रामनवमीला दिवाळीचं वातावरण असणार आहे. रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. रामनवमीला हा सोहळा होणार असून सूर्याभिषेकची यशस्वी चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे.  (How to perform Surya Abhishek on Ram Lalla in Ayodhya on Ram Navami video of testing viral)


रामनवमीला रामलल्लाला सूर्यभिषेक!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामनवमीला अयोध्येत राम मंदिरात 17 एप्रिलला दुपारी 12.16 मिनिटांनी 5 मिनिटांसाठी रामलल्लाच्या कपाळावर सूर्याची किरणे तिलक स्वरुपात लावण्यात येणार आहे. या सोहळ्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार तीन आरशांच्या माध्यमातून सूर्याची किरणे वेगवेगळ्या कोनातून वळवली जाणार आहे. त्यानंतर ते ब्रास पाईप्सद्वारे पुढे करण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अद्भूत आणि दिव्य अस्मरणीय क्षण रामनवमीला पाहता येणार आहे. 


रामचरित्रमानसनुसार रामनवमीच्या दिवशी दुपारी रामाचा जन्म हा दुपारी झाला होता. अयोध्येतील राम मंदिरात दिसणारा नजारा खूप सुंदर असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत दाखल झाले आहे. या मंदिराची रचना मूर्तीवर सूर्यभिषेक करताना येईल याप्रकारे बांधकामाच्या वेळी करण्यात आली आहे. याच सोहळ्याचा भाग कदाचित शास्त्रज्ञांनुसार मूर्तीची उंची आणि लांबी ठरवण्यात आली आहे. राम मंदिर पूजारांनी सांगितलं की, दरवर्षी रामनवमीला रामलल्ला यांच्यावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. 



वैज्ञानिकांचा अद्भुत प्रयत्नाना यश!


श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचा सत्येंद्र दास म्हणाले की, रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी चाचणी केली. या चाचणीला यश आलं असून त्यांच्या कामाचं आणि अद्भूत कार्याचं कौतुक आहे.