Maa Laxmi Puja On Friday: धन प्राप्तिसाठी शुक्रवारी करा हे अचूक उपाय; लक्ष्मीची होईल कृपावृष्टी!
How To Please Maa Laxmi: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असल्याचं मानलं जातं. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आर्थिक भरभराट लाभते.
Maa Laxmi Puja On Friday: 24 फेब्रुवारी रोजी शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी लक्ष्मी देवीची विधीवत पूजा केली जाते. अशी पूजा केल्याने लक्ष्मीची कायम आपल्यावर कृपा राहते आणि सुख-समृद्धी लाभते असं मानलं जातं. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा असेल तिला कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नाही. उलट अशा व्यक्ती समृद्ध आणि धनाढ्य असतात असं म्हटलं जातं. तसेच या व्यक्तीचं वैवाहिक आयुष्यही फार समाधानाचं असतं. ज्योतिष शास्त्रानुसार माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास शुक्रवारच्या दिवशी काही विशेष गोष्टी केले जातात. या उपायांच्या माध्यमातून सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जाणून घेऊयात लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी शुक्रवारी काय करावं...
धन प्राप्तीसाठी शुक्रवारी खालील उपाय केल्यानं तुमच्यावरही लक्ष्मी मातेची कृपा कायम राहिली आणि तुमच्या घरात लक्ष्मी कायम राहील.
> शुक्रवारी सकाळी गायीला पोळी खाऊ घाला. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. गोमातेला अन्न दिल्याने घरात पैशांची चणचण कधीच जाणवत नाही.
> आर्थिक चणचण असेल तर शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करा.
> आर्थिक नुकसान झालं असेल तर त्यामधून सावरण्यासाठी आणि वेगाने धनप्राप्ती करण्यासाठी शुक्रवारी 12 कौड्या जाळून त्याची राख बनवावी. त्यानंतर ही राख कापडामध्ये बांधून वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. असं केल्याने हळूहळू तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
> लक्ष्मी माता प्रसन्न रहावी म्हणून शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर अखंड ज्योति प्रज्वलित करावी. ही ज्योत 11 दिवस सतत तेवत ठेवावी. त्यानंतर 11 व्या दिवशी 11 मुलींना जेवू घालावं.
> दर शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरुन भगवान विष्णूचा अभिषेक करावा. असं केल्याने भागवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. धन-दौलत वाढवण्यासाठी याचा फायदा होतो.
> शुक्रवारी लक्ष्मीला लाल टिकली, सिंदूर, लाल ओढणी आणि लाल बांगड्या अर्पण केल्याने आर्थिक संकट टाळता येतं.
> शुक्रवारी कमळाची माळ बनवून खालील लक्ष्मी मंत्राचा जाप करावा -
विष्णुप्रिये नमस्तुभ्यं, नमस्तुभ्यं जगद्वते
आर्त हंत्रि नमस्तुभ्यं, समृद्धं कुरु मे सदा
नमो नमस्ते महांमाय, श्री पीठे सुर पूजिते
शंख चक्र गदा हस्ते, महां लक्ष्मी नमोस्तुते
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)