Rakshabandhan 2022:  श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीने या दिवशी राजा बलिला राखी बांधली होती. तेव्हापासून बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, अशी मान्यता आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहीण सुखी जीवनाची इच्छा व्यक्त करते, तर भाऊ रक्षा करण्याचा संकल्प करतो. पण शास्त्रामध्ये राखी बांधण्याचे काही नियम सांगितले आहे. त्यामुळे राखी बांधताना अशा चुका टाळणं गरजेचं आहे. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    राखीवर देवतांची चित्रे नसावीत. कारण राखी बांधल्यावर  कधी कधी अपवित्र कार्य घडतात. त्यामुळे देवाचा अपमान होतो.

  • भावाच्या मनगटावर चुकूनही काळ्या धाग्यातील राखू बांधू नका.

  • मनगटावर खंडित किंवा तुटलेली राखी बांधू नका.

  • शास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुासर मनगटावर अशुभ चिन्ह असलेली राखी बांधू नका.

  • राखी बांधताना मनगटावर तीन गाठी बांधाव्यात. मनगटावर बांधलेल्या तीन गाठी देवाशी संबंधित आहेत.

  • राखी बांधतानाही जमिनीवर बसू नका, तर खुर्ची, पाट किंवा आसनावर बसा.


राखी बांधण्याची शुभ वेळ


श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजता समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, 11 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असल्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार, गुरुवारी, 11 ऑगस्टला पौर्णिमा असल्याने, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधेल. या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ शुभ मानली आहे. या दिवशी 5:17 ते 6.18 ही वेळ शुभ आहे. 


रक्षाबंधन शुभ योग


अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:08 ते 12:59 पर्यंत
अमृत ​​काळ: संध्याकाळी 06.55 ते 08.20 पर्यंत
रवि योग: सकाळी 06:07 ते 06:53 पर्यंत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)