रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी `हे` नियम वाचा; राशीनुसार कोणता रुद्राक्ष घालावा? जाणून घ्या
Rudraksha Guide In Marathi: रुद्राक्ष हे हिंदू धर्मात आणि हिंदु संस्कृतीत पवित्र मानले जाते. मात्र, रुद्राक्ष कसं धारण करावे, याबाबतचा नियम जाणून घ्या.
Rudraksha Benefits: हिंदू धर्मात रुद्राक्ष परिधान करणे पवित्र मानलं जातं. रुद्राक्षचा थेट संबंध हा महादेवाशी असल्याने देशातील भाविक मोठ्या श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण केल्यास भगवान शंकराची आशीर्वाद प्राप्त होतो आणि सगळ्या संकटातून रक्षण मिळते, अशी मान्यता आहे. पण रुद्राक्ष धारण करण्याचीही एक पद्धत व काही नियम आहेत. रुद्राक्ष घातल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची संपूर्ण माहिती.
रुद्राक्ष वृक्ष आणि बीज या दोघांना रुद्राक्ष म्हणतात. रुद्राक्षाचे झाड नेपाळ, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आणि म्यानमार देशातील डोंगराळ भागात वाढते. रुद्राक्ष झाडाच्या फळांना आध्यात्मिक महत्त्वेबरोबरच औषधी गुणधर्मदेखील आहेत. असं म्हणतात रुद्राक्ष धारण केल्यास आयुष्य वाढते आणि शत्रूंपासून बचाव होतो. एकूण चौदा प्रकारचे रुद्राक्ष पृथ्वीवर आढळतात त्याचबरोबर गौरी शंकर रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्षदेखील आढळतात. रुद्राक्ष कसा धारण करावा, यावर एक नजर
रुद्राक्ष लाल किंवा काळ्या धागातूनच परिधान करावा. त्याचबरोबर पौर्णिमा, अमावस्या किंवा सोमवारी रुद्राक्ष धारण करणे श्रेष्ठ मानले जाते. श्रावण महिन्यात रुद्राक्ष कोणत्याही दिवशी परिधान केले जाऊ शकते. कारण श्रावण महिन्यातील सगळेच दिवस शुभ असतात. रुद्राक्ष 1, 27,54 आणि 108 संख्यानुसार धारण करावे. रुद्राक्ष परिधान केल्यानंतर सात्विक धोरणाचे पालन करावे, असं ज्योतिषशास्त्र सांगते. रुद्राक्षाला एखाद्या धातूसोबत परिधान करण्याने अधिक चांगले लाभ मिळतात. इतंकच नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीने आधीच परिधान केलेली रुद्राक्षाची माळ स्वतः घालू नये. तसंच, झोपताना रुद्राक्षाची माळ काढून झोपावे.
एक मुखी रुद्राक्ष
एक मुखी रुद्राक्ष हे साक्षात भगवान शंकराचे रुप मानले जाते. सिंह रास असलेल्या लोकांसाठी एक मुखी रुद्राक्ष शुभ मानले जाते. पत्रिकेत एक सूर्य ग्रहासंबंधी काही समस्या असतील तर एक मुखी रुद्राक्ष धारण करावे, असा सल्ला दिला जातो.
दोन मुखी रुद्राक्ष
हे रुद्राक्ष अर्धनारीश्वर रुप मानले जाते. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे रुद्राक्ष खूप शुभ मानले जाते. वैवाहिक समस्या असल्यास दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे.
तीन मुखी रुद्राक्ष
हे रुद्राक्ष अग्नि आणि तेजांचे रुप असते. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे रुद्राक्ष लाभकारक ठरते. मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी हे रुद्राक्ष धारण करण्याची मान्यता आहे.
चार मुखी रुद्राक्ष
हे रुद्राक्ष ब्रह्माचे स्वरुप मानले जाते. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हे रुद्राक्ष सर्वो्त्तम आहे. त्वचा रोग असलेल्या लोकांनी हे रुद्राक्ष परिधान करावे.
पंचमुखी रुद्राक्ष
कलाग्नी असं देखील म्हणतात. मंत्र शक्ती आणि अद्भुत ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे रुद्राक्ष धारण करतात. धनु आणि मिन राशीच्या लोकांना शिक्षणात अडथळा येत असेल तर ते हे रुद्राक्ष परिधान करु शकतात.
सहा मुखी रुद्राक्ष
या रुद्राक्षाला कार्तिकेयचे रुप मानले जाते. पत्रिकेत शुक्राचा प्रभाव अधिक असेल तर तुळ किंवा वृषभ राशीच्या लोकांनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावे.
सात मुखी रुद्राक्ष
हे सप्तमातृका आणि सप्तऋषींचे स्वरूप मानले जाते. कठीण परिस्थितीत आणि गंभीर परिस्थितीत ते परिधान करा
अष्टमुखी रुद्राक्ष
हे आठ देवींचे रूप आहे. हे धारण केल्याने आठ सिद्धी प्राप्त होतात तसंच, धनप्राप्ती सहज होते, ज्यांच्या कुंडलीत राहूशी संबंधित समस्या आहेत. त्याने आठ मुखी रुद्राक्ष धारण करावे.
अकरा मुखी रुद्राक्ष
अकरा मुखी रुद्राक्ष हे स्वतः भगवान शंकराचे रूप मानले जाते. मुलाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि संतती प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष धारण करणे आवश्यक आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )