मुंबई : आपण एखाद्यावर व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. पण ती व्यक्ती आपली फसवणूक करत असेल तर... असा विचार जरी केला, तर मन भरून येतं. आपण ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत, तो व्यक्ती खरंच आपल्यासोबत प्रामाणिक आहे की नाही... या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण जेव्हा आपल्यासमोर त्या व्यक्ती खरा चेहरासमोर येतो, तेव्हा होणारा माणसिक त्रास फार भयानक असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलेशनशिपमध्ये तुमची फसवणूक होत असेल तर, हे संकेत तुम्ही जाणून घ्या


- नात्यात तुमचा पार्टनर जर सतत तुमच्या चुका सांगत असेल, तर जाणून घ्या ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमचा वापर करत आहे. 


- नात्यात तुमचा पार्टनर तडजोड करत असेल तर उत्तम आहे. पण जर सतत तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असेल तर अशा नात्यातून बाहेर पडा.


- जर तुमचा पर्टनर फक्त त्याला हवं तेव्हा तुम्हाला फोन करत असेल, रिकाम्यावेळेत तुमच्यासोबत राहत असेल तर अशी व्यक्ती तुमचा फक्त वापर करत आहे. 


-  सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुमचा पार्टनर तुमच्या अडचणी न ऐकता, फक्त स्वतःचा विचार करत असेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात...