पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का झोपावं? जाणून घ्या कारण
Astro Tips for Husband Wife Relation: ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वास्तु शास्त्रामध्ये (vastu shastra) पती आणि पत्नी यांच्या झोपण्याची पद्धत आणि दिशा संबंधित माहिती दिलीये. या नियमांपैकी एका नियमामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे असं नमूद करण्यात आलंय.
Husband Wife Sleeping Tips: रात्री झोपताना (Night sleep) आपण शक्यतो दिशेचा विचार करत नाही. दमून आल्यानंतर झोपं घेणं हे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. मात्र वास्तु शास्त्रानुसार (bedroom vastu tips) पत्नीने झोपताना डावी किंवा उजवी बाजू यांचा विचार करून झोपणं फार महत्त्वाचं आहे. धार्मिक गोष्टींमध्ये काही नियम देण्यात आले आहेत.
ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वास्तु शास्त्रामध्ये (vastu shastra) पती आणि पत्नी यांच्या झोपण्याची पद्धत आणि दिशा संबंधित माहिती दिलीये. या नियमांपैकी एका नियमामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे असं नमूद करण्यात आलंय.
आजच्या या लेखातून जाणून घेऊया की, का पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे?
पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी भगवान शिवाने अर्धनारेश्वराचं रूप धारण केलं होतं त्यावेळी त्याच्या शरीराच्या डाव्या बाजूने स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली होती. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये पत्नीला वामांगी म्हटले जाते. वामांगी या शब्दाचा अर्थ म्हणजे डाव्या अंगाचा धारक. त्यामुळे पुरुषाचा डावा भाग स्त्रीचा भाग मानला जातो. म्हणून शुभ कार्यामध्येही पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला स्थान दिलं जातं.
डाव्या बाजूला झोपणं शुभं मानलं जातं
वास्तूशास्त्रामध्ये असं नमूद करण्यात आलंय की, पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणं हे फार शुभ मानलं जातं. पत्नी जर पतीच्या डाव्या झोपली तर पत्नी वैवाहिक जीवनासाठी तसंच पतीसाठी ही बाब शुभ मानली जाते. यामुळे वैवाहिक जीवन सुख, समृद्धी येत असल्याचं मानलं जातं.
पतीचं रक्षण होत असल्याची मान्यता
असंही मानलं जातं की, पत्नी जर पतीच्या डाव्या बाजूला झोपली तर पतीचं रक्षण होतं. असं म्हटलं जातं की, ज्यावेळी यमराज सत्यवानाला मारण्यासाठी आले, त्यावेळी ते डाव्या बाजूने आले. मात्र या कठीण वेळी सावित्रीने आपल्या पतीचं रक्षण करून त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे पतीच्या डाव्या बाजूला झोपल्याने त्याचं यमराजापासून रक्षण होतं, असा समज आहे. म्हणजेच पत्नी पतीला कोणत्याही संकटापासून वाचवू शकते.
याशिवाय काही शुभं कामांमध्ये स्त्रीने पुरुषाच्या उजव्या बाजूला राहावं असंही शास्त्रात सांगण्यात आलं आहे. शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे, कन्यादान, विवाह, यज्ञकर्म, जातकर्म, नामकरण यांसारख्या शुभ कार्यांमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला राहिलं पाहिजे.