Importance of of Mole: तुमच्या शरीराच्या या भागावरील तिळ, तुमचं काय भविष्य सांगतोय जाणून घ्या
आपल्या शरीरावरील कोणत्या ना कोणत्या भागावर आपल्याला तिळ (Mole) हे असतात. ते काही शरीरातील बदलांमुळे यातात त्यामागे सायन्स तर आहेच, परंतु जोतिषशास्त्रात देखील यामागची कारणे सांगितली गेली आहेत. जोतिषशास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर तिळ असण्याचे वेगवेगळे महत्व सांगितले गेले आहे.
मुंबई : आपल्या शरीरावरील कोणत्या ना कोणत्या भागावर आपल्याला तिळ (Mole) हे असतात. ते काही शरीरातील बदलांमुळे यातात त्यामागे सायन्स तर आहेच, परंतु जोतिषशास्त्रात देखील यामागची कारणे सांगितली गेली आहेत. जोतिषशास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर तिळ असण्याचे वेगवेगळे महत्व सांगितले गेले आहे.
ज्योतिषानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कापाळावर तिळ असल्यास त्याचा अर्थ असा होतो की, आयुष्याच्या सुरूवातीला संघर्ष करण्याची गरज तुम्हाला लागू शकते परंतु त्यानंतर तो व्यक्ती धनवान होऊ शकतो.
ज्या व्यक्तीच्या ओठांवरती तिळ आहे, अशी व्यक्ती स्वभावाने खूप प्रेमळ असते. अशा लोकांचे एकापेक्षा जास्त लोकांशी प्रेम संबंध असतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या गालावरती तिळ असतो अशी व्यक्ती खूप आकर्षक असते. असे लोक आकर्षक होण्याबरोबरच धनवान देखील असतात.
ज्या लोकांच्या छातीवर तिळ असताता, त्यांना कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय साधण्याबाबत खूप अडचणी निर्माण होतात.
पायाच्या तळव्यांवर तिळ असलेली व्यक्ती नेहमी आपल्या कुटूंबापासून लांब जाते. परंतु हे देखील तितकच खरं आहे की, अशा लोकांना जीवनात चांगले यश देखील मिळते.
दुसरीकडे, पोटावर तीळ असलेले लोक खूप श्रीमंत असतात. तथापि, अशा लोकांचे आरोग्य बर्याच वेळा खराब होत असते.
जर तुमच्या हातांच्या मध्यभागी तिळ असेल, जे तुमच्या हाताच्या कोणत्याही मुख्य रेषेवरती नसेल, तर असे तिळ व्यक्तीच्या आयुष्यात समृद्धी आणतात. जर व्यक्तीच्या शिरावर (रेषेवर) किंवा बोटांवर तिळ (Mole) असेल तर ते अशुभ मानले जाते.
ज्या हाताच्या रेषेवर तिळ असेल, त्या ती रेष ज्या भविष्याशी निगडीत आहे, त्यावर संकट येऊ शकतो. त्याचप्रमाने ज्या बोटावर तिळ असेल, तो या व्यक्तीचेग्रह देखील कमकुवत करतो. याशिवाय हाताच्या मागील बाजूस तिळ असलेले लोकं खूपच भाग्यवान मानले जातात.
ज्या लोकांच्या नाकावर तीळ आहे. अशा व्यक्तींच्या जीवनात संघर्ष वाढतो. ओठांच्या वर तीळ असलेली व्यक्ती ही लोकांमध्ये खूप लोकप्रिय असते. परंतु असे लोकं खुप कमी लोकांनाच आपले मानतात. ज्या लोकांच्या नाकाखाली तीळ असते अशा लोकांना कमी लोकांमध्ये मिसळणे आवडते.
काळ्या तिळव्यतिरिक्त आपल्या शरीरावर लाल तीळ देखील आहे. शरीरावर त्यांच्या स्थानानुसार ते शुभेच्छा आणि अशुभ या दोहोंचे प्रतीक आहेत. जर तोंडावर लाल तीळ असेल तर अशा व्यक्तीचे विवाहित जीवन संकटात असेल. तर दुसरीकडे, हातावर लाल तिळ असणे हे शुभ मानले जाते, जे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक बळकटी आणते. छातीवर लाल तीळ असलेली व्यक्तीच्या आयुष्यात परदेशात जाऊन पैसे कमावण्याची शक्यता आहे.
(टीपः या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. 24तासडॉटकॉम त्यास पुष्टी देत नाही.)