Shani Vakri 2024 Effects on Zodiac Signs: प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रह राशी बदलाप्रमाणे त्यांच्या वक्री आणि मार्गस्थ होतात. सर्व 9 ग्रहांपैकी, शनी हा सर्वात हळू फिरणारा ग्रह आहे. 30 वर्षांनंतर, शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 2025 च्या मध्यापर्यंत शनी या राशीत राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या काळात शनी आपली हालचाल बदलणार आहे. 2024 मध्ये शनी आपली स्थिती बदलेल. सध्या शनी कुंभ राशीत मार्गस्थ आहे. तर जून 2024 मध्ये शनि वक्री होणार आहे. शनी वक्री होताच सर्व 12 राशींवर त्याचा मोठा प्रभाव पडेल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अधिक लाभ मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


शनीची उलटी हालचाल मेष राशीच्या लोकांना खूप लाभ देणार आहे. या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतात. व्यावसायिक नवीन सौदे करू शकतात, हा काळ त्यांना शुभ परिणाम देईल. वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्याल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असल्यास प्रवासालाही जाऊ शकता. तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. 


वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांनाही शनीची वक्री गती लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा असणार आहे. शनी वक्री होताच या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. 


मकर रास


मकर राशीचा स्वामी शनी असून तो वक्री झाल्याने या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार आहेत. या काळात शनी भरपूर धन देणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करू शकणार आहात. तुमचा नफा वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील हा काळ प्रत्येक क्षेत्रात लाभ देऊ शकतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)