मुंबई : कुटुंबातील प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. तुम्ही हे देखील पहिलं असेल की, काही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी खूप भांडतात. तर काही कुटूंबात तुम्हाला असेही पाहायला मिळेल की, लोकं एकमेकांसोबत प्रेमाने राहातात. त्यांना प्रेम देतात आणि त्यांची काळजी घेतात. या लोकांच्या स्वभावात देखील फरत पडतो आणि हे लोकं कालांतराने बाहेरच्या लोकांशी देखील मोठ-मोठ्या आवाजात बोलतात आणि लगेच चिडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरुण पुराणात यासंबंधीत असे म्हटले आहे की, आपल्या वाईट सवयीच अशा परिस्थितींसाठी जबाबदार असतात. ज्यामुळे आपल्याला वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. खरेतर तुमच्या वाईट सवयी तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो.


रात्रभर भांडी किंवा उष्टे अन्न ठेऊ नका


जुन्या काळात लोक रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे साफ केल्यानंतरच झोपायला जायचे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत, स्वयंपाक करण्यापासून, भांडी धुण्यापासून आणि घराची स्वच्छता करण्यापर्यंत, लोकांना वेळ मिळत नाही. मेड सकाळी किंवा दुपारी येते. अशा परिस्थितीत रात्रीची घाणेरडी भांडी स्वयंपाकघरातच गोळा केली जातात.


परंतु गरुण पुराणात असे म्हटले आहे की, रात्रीची खरकटी भांडी ठेवण्याची तुम्हाला सवय असेल, तर ते तुमच्या घरात दारिद्र्याचे कारण बनू शकते. ज्यामुळे ते केव्हा ही साफ करा.


घर अस्वच्छ ठेवणे


घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा रोग वाढायला वेळ लागत नाही. गरुण पुराणानुसार देवी लक्ष्मी कधीही गलिच्छ आणि खरात ठिकाणी वास करत नाही. ज्यामुळे लोकांचा अनावश्यक खर्चही वाढतो. तसेच यामुळे कुटुंबात मतभेद देखील वाढू लागतात. ज्यामुळे मोठ-मोठी भांडणं होऊ लागतात.


रद्दी गोळा करणे


लहान घर असल्याने बहुतेक लोक घराची रद्दी छतावर ठेवतात, त्यानंतर या रद्दीची काळजीही घेतली जात नाही. पण गरुण पुराणात सांगितले आहे की, घराच्या कोणत्याही भागात रद्दी ठेवू नये. रद्दी गोळा केल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि आर्थिक संकट आणि संकटाच्या परिस्थिती निर्माण होतात.