मुंबई : देशभरात कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरु आहे. यावर्षी 3 सप्टेंबरला देशभरात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. काही ठिकाणी 2 सप्टेंबरला देखील जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. भाद्रपद अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्ण यांना भगवान विष्णुचा अवतार मानलं जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. अष्ठमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णांच्या जन्म वेळी पारायण केलं जातं. अनेक जण मथुराला जावून श्रकृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेतात. मुंबईत दहीहंडीच्या माध्यमातून जन्माष्टमी साजरी होते.


जन्माष्टमीचा मुहूर्त...


- 2 सप्टेंबर 2018 ला रात्री 20:47 वाजता अष्टमीची तिथी सुरू होते.
- 3 सितंबर 2018 ला संध्याकाळी 19:19 वाजता ही तिथी संपते.


- मुहूर्त- 23:58 ते 24:44 वाजेपर्यंत


हा मुहूर्त उपवास करणाऱ्यांसाठी आहे. कारण 3 सप्टेंबरला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रोहणी नक्षत्र राहणार आहे. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव 3 सप्टेंबरला रात्री साजरा केला जातो. पारायण 3 सप्टेंबरला रात्री 8 वाजता सुरु करु शकता.