Gaj Kesari Yoga: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा परिस्थितीत ज्यावेळी चंद्र राशी बदलतो तेव्हा एखाद्या ग्रहाशी संयोग होतो, ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. लवकरच चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे देवांचा गुरु आधीच उपस्थित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7:31 वाजता चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.28 पर्यंत या राशीत राहणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत मेष राशीत गजकेसरी योग असणार आहे. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.


मेष रास


चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे या राशीत गजकेसरी राजयोग तयार होताना दिसतोय. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्ही बचतही करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. उच्च अधिकारी खूश होऊन तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. 


वृश्चिक रास


गजकेसरी योग या राशीसाठीही नशीबवान ठरणार आहे. आनंद आणि नशिबात वाढ झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. वैवाहिक जीवनातही आनंद मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरेल. कुटुंबाची परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.


कर्क रास


या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची स्थिती हळूहळू सुधारू शकणार आहे. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. कुटुंबातील सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते. व्यवसायातही मोठे बदल होऊ शकतात. या काळात योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )