Jyotish Shastra For Cars:  कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर आपण चांगला मुहूर्त किंवा ज्योतिषांकडे  (astrology)  जात असतो.  किंवा एखादी वस्तू म्हणजे जमीन, घर, गाडी, ऑफीस खरेदी करायची असेल तर आपण ज्योतिषशास्त्रांना नक्कीच विचारात घेतो. आजही भारतात मोठी लोकसंख्या आहे जी ज्योतिषावर विश्वास ठेवते आणि ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) महत्त्वाचे काम करते. यामध्ये काही अपवाद असतात जे ज्योतिषशास्त्रांवर विश्वास ठेवत नाही. आजही बरेच नागरिक आहेत जे ज्योतिषशास्त्रानुसार ठरलेल्या दिवशी आणि वेळेनुसार कार खरेदी करतात. जर तुमचाही ज्योतिषावर विश्वास असेल तर तुम्हालाही कार आणि ज्योतिष शास्त्राशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. जसे की कारमध्ये अशा काही गोष्टी आहेत,ज्या कार मध्ये ठेवलात तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कारमध्ये ठेवू नये...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांची कार कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखी दिसावी. यासाठी लोक आपली कार घासून पुसुन साफ ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमची कार आतून स्वच्छ नसेल तर केबिनमध्ये दुर्गंध पसरेल. कारमधून दुर्गंधी सुटली तर त्यामध्ये बसायला कोणालाच आवडणार नाही.  


वाचा : आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match? 


या गोष्टी कारमध्ये ठेवू नये


अनेकाच्या कारची ट्रंक खूप मोठी असते. त्यामुळे त्यामध्ये हवं नको ते सर्व सामान ठेवतात. पण, ज्योतिष शास्त्रानुसार गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवलेल्या अनावश्यक गोष्टी हानिकारक आणि अशुभ ठरू शकतात. ज्योतिष शास्त्राचा विचार केला अशा गोष्टी गाडीमध्ये ठेवल्या तर शनिदेव क्रोधित होतात. ज्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीवर नकारात्मक प्रभाव देखील पडू शकतो. परिणामी तुम्ही तुमच्या कारमध्ये ट्रंकमध्ये कचरा, जुनी बिले, अनावश्यक कागदपत्रे, खराब बाटल्या सारख्या वस्तू पडल्या असतील तर त्या ताबडतोब बाहेर काढून टाका. असे केल्याने तुमच्या गाडीची ट्रंक देखील स्वच्छ राहते. त्यात फक्त स्टेपनी आणि टूल किट सारख्या आवश्यक गोष्टी ठेवल्या पाहिजेत.


कारमध्ये स्वच्छता ठेवा


जर तुमच्या कारमध्ये अस्वच्छता असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार नाही. कारण देवी लक्ष्मीला घाण आवडत नाही आणि ती घाणीत राहत नाही. म्हणूनच, लोकांना घर स्वच्छ ठेवण्यास सांगितले जाते. हीच गोष्ट कार मध्ये ही लागू होते. जर असे नाही झाले तर तुम्ही कितीही पैसे कमवा ते पैसे तुमच्याकडे टिकणार नाही. उलट ते खर्च होईल. त्यामुळे तुमच्या कारमध्ये नेहमी स्वच्छता ठेवा जेणेकरून तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद राहिल..