Kartik Amavasya 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. मंगळवारी ही अमावस्या आल्यामुळे याला भौमवती अमावस्या म्हटलं जातं. ही या वर्षातील शेवटची अमावस्या असून यादिवशी शनि आणि मंगळ एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या भावात आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. या दिवशी केंद्र योगासोबतच त्रिग्रही योग, आदित्य मंगल योग, धृतिमान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Kartik Amavasya 2023 Saturn Mars Kendra Yoga on Bhaumvati Amavasya Lottery for zodiac sign people of this amount)


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांची करिअरमध्ये काही प्रगती होणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. स्वतःचा व्यवसाय करणार्‍यांसाठीहा योग फायदेशीर असणार आहे. तुमच्यासाठी चांगल्या व्यवहारातून आर्थिक लाभ होणार आहे. 


तूळ (Libra Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी धृतिमान योगामुळे शुभ ठरणार आहे. भागीदारीतून चांगले आर्थिक लाभ होणार आहे. तुम्ही कोणत्याही वादात अडकले असाल तर तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून मदत मिळणार आहे. शुभ योगामुळे तुम्हाला मान-प्रतिष्ठेचे अपार लाभ होणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)


अनेक शुभ योगांमुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या राशीमध्ये चंद्र, मंगळ आणि सूर्य यांचा संयोग अनेक लाभ घेऊन आले आहेत. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यावसायिक जीवनात काही बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र योगामुळे शुभ ठरणार आहे. विवाहित लोकांसाठी भौमवती अमावस्या शुभ ठरणार आहे.  लहान व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्याने आर्थिक मजबूती मिळणार आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळणार आहे. 


मीन (Pisces Zodiac)


ज्येष्ठ नक्षत्रामुळे मीन राशीच्या लोकांसाठी आनंददायी दिवस ठरणार आहे. आत्मविश्वासाने आणि हुशारीने कोणतेही कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)