Kartik Purnima 2023 : देव दिवाळी व कार्तिक पौर्णिमेला `या` 5 राशींचे भाग्य चमकणार, अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. माता लक्ष्मी त्यांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ करणार आहे.
Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा असून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्यात येते. आजची कार्तिक पौर्णिमा 5 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत द्विगुणीत वाढ होणार आहे. (Kartik Purnima 2023 or Dev Diwali fortunes of these 5 zodiac signs will shine unexpected wealth and strong opportunity for progress)
मेष (Aries Zodiac)
कार्तिक पौर्णिमेचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. तुमचं उत्पन्न घसघशीत वाढ होणार आहे. तुम्ही आर्थिक गुंतवणुकीबाबत योजना आखणार आहात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. तुमची प्रकृतीत सुधारणा होणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
कार्तिक पौर्णिमेला तुमचं वैवाहिक जीवन मधुर होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्हाला काही आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला इतरांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल. कार्तिक पौर्णिमेला तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेणार आहात.
कर्क (Cancer Zodiac)
कार्तिक पौर्णिमेचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. ज्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार आहे. या दिवशी तुमचं उत्पन्नही वाढणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा कमावण्याची संधी मिळणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा प्रस्ताव येणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसचे सहकार्य लाभणार आहे. काळ अनुकूल राहील, यामुळे कामात यश मिळणार आहे. तुमचा पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमचा प्रभाव वाढणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळण्यात यशस्वी होणार आहात.
कुंभ (Aquarius Zodiac)
तुमच्या राशीच्या लोकांना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आईकडून लाभ होणार आहे. तुम्ही घर, वाहन, जमीन इत्यादी खरेदी करु शकता. मात्र पैशांचे सर्व नियम पाळा. या दिवशी तुम्ही तुमच्या सुख-सुविधांवर पैसे खर्च करणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)