Karva Chauth Vrat Date 2024 : महाराष्ट्रात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हे व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी आणि सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून करतात. तसंच हिंदू धर्मात करवा चौथ केला जातो. बॉलिवूड चित्रपट असो किंवा छोट्या पडद्यावरील मालिका असो यात अभिनेत्री करवा चौथचं व्रत करताना दिसल्या आहेत. हे व्रत खूप कठीण असतं असं म्हणतात. एवढंच नाही तर खऱ्या आयुष्यात अनुष्का शर्मा, कतरिना कैफपासून अनेक सेलिब्रिटीची हे व्रत एकत्र साजरा करतात. आज महाराष्ट्रीयन मुली हिंदू मुलांशी लग्न करतात. अशा वेळी त्यांना या व्रताबद्दल माहिती असावं. शिवाय आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत कोणतीही महिला करु शकतात. तर तुम्हीही यंदा करवा चौथ करायचा ठरवलं असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. (karva chauth 2024 date time puja vidhi and moon rise time in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करवा चौथ व्रत कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा करण्यात येतं. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. हे व्रत सूर्योदयापासून रात्री चंद्रोदयापर्यंत पाळलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावर विधीवत पूजा करण्यात येते. नंतर रात्री चंद्र पाहून उपवास सोडला जातो. 


करवा चौथ व्रत 2024 कधी ?


कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थी  तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 वाजेपासून 21 ऑक्टोबरला पहाटे 4:16 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबर 2024, रविवारी करवा चौथ व्रत करण्यात येणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?


 


करवा चौथ पूजा मुहूर्त 2024


करवा चौथ व्रत आणि पूजेची वेळ संध्याकाळी 5.46 ते 7.02 वाजेपर्यंत असणार आहे. 


करवा चौथ व्रत वेळ 2024


करवा चौथ व्रत 20 ऑक्टोबरला सकाळी 6:25 वाजेपासून चंद्रदर्शनानंतर 7:54 वाजेपर्यंत असणार आहे.


करवा चौथ 2024 चंद्रोदय वेळ


करवा चौथच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 07:54 वाजता असणार आहे. चंद्राचं दर्शन करुन व्रत सोडलं जातं. 


करवा चौथ पूजा विधी


करवा चौथ व्रताची सुरुवात सकाळी सर्गीने केली जाते. सर्गीमध्ये सासू सुनेला पौष्टिक पदार्थसह सौभाग्याचं लेण देते. यानंतर महिलांनी देवाची पूजा करून निर्जला व्रताची शपथ घ्यायची असते. संध्याकाळी मातीच्या वेदीवर सर्व देवी-देवतांची प्रतिष्ठापना केली जाते. यानंतर उदबत्ती, दिवा, चंदन, रोळी, सिंदूर, तूप इत्यादी वस्तू ताटात ठेवाव्या लागतात. ही पूजा चंद्रोदयापूर्वी करण्यात येते. यादरम्यान करवा चौथची कथाही ऐकली जाते. यानंतर महिला रात्री चंद्राला अर्घ्य देतात. मग ती पतीच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडतात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)