Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?

Kojagiri Purnima 2024 :  पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 16, 2024, 08:24 AM IST
Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध? title=
Sharad Purnima kojagiri paurnima 2024 on october 16 or 17 Date Shubh muhurat pooja rituals

Kojagiri Purnima 2024 Date : शारदीय नवरात्री आणि विजयादशमीनंतर वेध लागतात ते कोजागरी पौर्णिमेचे...हिंदू धर्मात कोजगरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून ती वर्षातील सर्वात शुभ आणि मोठी पौर्णिमा मानली जाते. यादिवी चंद्र प़ृथ्वीच्या खूप जवळ येतो. त्यामुळे चंद्राचा आकार मोठा दिसतो. तर यंदा कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली आणि रोग पंचक असल्याने चंद्राला मसाला दूध कधी दाखवायचं याबद्दल संभ्रम आहे. अशी ही कोजागरी पौर्णिमा किंवा शारदीय पौर्णिमाची तिथी, पूजा विधीसह जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

शरद पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त

पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबरला रात्री 8.45 मिनिटांपासून 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.50 मिनिटांपर्यंत असणार आहे. पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाच्या वेळेला महत्त्व असल्याने यंदा शरद पौर्णिमेचे व्रत 16 ऑक्टोबरला करायचं आहे. या दिवशी चंद्रदेवाची पूजा आणि चंद्र प्रकाशात मसाला दूध ठेवायला महत्त्व आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Kojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा

 

शरद पौर्णिमा 2024 मुहूर्त

16 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध किंवा खीर ठेवण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेला संध्याकाळी 5:05 वाजता चंद्र उगवणार आहे. त्या दिवसाचा सूर्यास्त संध्याकाळी 5:50 वाजता होणार आहे. 

कोजागरी पौर्णिमेला दूध दाखवायचा मुहूर्त  

शरद पौर्णिमेला संध्याकाळी 7:18 पासून रेवती नक्षत्र सुरू होईल. रेवती नक्षत्र शुभ मानलं जातं. तुम्ही शरद पौर्णिमा दूध संध्याकाळी 7.18 नंतर ठेवू शकता. मात्र, शरद पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण दृष्टीस पडते आणि त्याची किरणे तुमच्यापर्यंत पोहोचू लागतात. 

कोजागरी पौर्णिमा पूजा विधी

पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करा. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या दोन पानांवर सुपारी ठेवा. तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा ठेवा. त्यात आंब्याचा डगळा हे इंद्राचे प्रतिक म्हणून ठेवा. तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करुन ठेवा. रात्री 12 ते 12.30 या 30 मिनिटात दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवा. जेणे करुन चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात. 

त्यानंतर 12.30 ला पूजेच्या पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुलं, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करा. 

शरद पौर्णिमा महत्त्व 

शरद पौर्णिमा हा धार्मिक सण तसंच शेकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पिक कापणीचा उत्सव देखील आहे. हा सण पावसाळा ऋतुचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवितो. या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना देखील केली जाते. मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सर्व 16 कलांनी संपन्न होत उदयास येतो. या दिवशी खीर बनवून ती रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. मान्यतेनुसार, असे केल्याने खीरमध्ये अमृताचे गुण येतात. वैज्ञानिकदृष्ट्या देखील याला महत्त्व असून शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे खीरमधील पोषक तत्त्वांमध्ये वाढ होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)