मुंबई : घरात सुख-समृद्धीसाठी लोक वास्तूची मदत घेतात. वास्तूप्रमाणेच फेंगशुई देखील खूप प्रभावी आहे. फेंगशुईनुसार घरात वस्तू ठेवल्याने घरात येणारी संकटं टळतात, असं मानलं जातं. फेंगशुईमध्ये फिश टँकला ​​खूप महत्त्व आहे. याचं योग्य नियमाने पालन केल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील पैशाची अडचण दूर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरात फिश टँक असेल किंवा तुम्ही ते आणणार असाल तर ते ठेवण्याच्या दिशेची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. फिश टँक घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.


फिश टँकमधील पाणी वेळोवेळी बदललं पाहिजे. तेच पाणी जास्त काळ वापरू नये, कारण असं न केल्याने पाण्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही.


जर तुम्ही घरात फिश टँक ठेवलं असेल तर साहजिकच कधीतरी मासे मरतील. अशा स्थितीत मृत मासे ताबडतोब काढून टाकावेत. मृत मासे जास्त वेळ टँकमध्ये ठेवल्यास अशुभ परिणाम मिळतात. त्याच वेळी, समान रंगाचे मासे टँकमध्ये ठेवले पाहिजेत. फेंगशुईमध्ये रंग आणि संख्या यांचा मिलाफ असणं खूप महत्त्वाचं आहे.


घरात ठेवलेल्या फिश टँकमध्ये किती मासे ठेवलेत याचीही नोंद घ्यावी. फेंगशुईमध्ये माशांच्या संख्येला आणि रंगालाही खूप महत्त्व आहे. टँकमध्ये किमान 9 मासे असावेत. यापैकी आठ लाल आणि एक सोनेरी किंवा काळ्या रंगाचा असावेत. काळ्या रंगाचा मासा फेंगशुईमध्ये संरक्षणाचे प्रतीक मानला जातो.


अनेकांना फिश टँक ठेवण्याची खूप आवड असते. मात्र, घरात जागा नसताना तो इकडे तिकडे ठेवतो. फिश टँक कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. त्याठिकाणी अग्निच्या तत्वाचा वास असतो. स्वयंपाकघरात मत्स्यालय ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होतो.


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)