Kharmas March 2023 in marathi : ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह याला खूप महत्त्व आहे. यावर आपला येणारा काळ, त्यातील अचडणी पाहिल्या जातात. शिवाय ग्रहांच्या गोचरमुळे होणारे परिणाम, शुभ आणि अशुभ वेळ याही एवढंच महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद कार्य शुभ वेळेत केल्यास ते तुम्हाला फलदायी ठरतं. अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुभ वेळ फार महत्त्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा सूर्य हा मीन (Surya Gochar 2023) किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरु होतो. त्यामुळे सूर्याने मीन राशीत प्रवेश केला त्यामुळे आता पुढील एक महिना आपल्याला कुठलही शुभ कार्य करता येणार नाही. (Kharmas March 2023 dos and dont for prosperity and wealth Effects on zodiac signs Astrology in marathi )


'ही' कामं करु नयेत!


सूर्य मीन राशीत 14 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या काळात लग्न, घर किंवा मालमत्ता खरेदी करु नये. मुंडन, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी इत्यादी गोष्टी करु नयेत. एकंदरीतच ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही शुभ कार्य या काळात करु नयेत. 


खरमासाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मेष, कर्क, सिंह, कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. चला तर जाणून घेऊयात कुठल्या राशीला काय काळजी घ्यायची आहे ते... 


राशींवर काय परिणाम होणार?


मेष (Aries) - डोळ्याची काळजी घ्यावी.


वृषभ (Taurus) - अडकलेली कामं मार्गी लागतील आणि आर्थिक लाभ होईल. 


मिथुन (Gemini) - आरोग्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. 


कर्क (Cancer) - आरोग्याची आणि प्रवाश्यादरम्यान काळजी घ्या. 


सिंह (Leo) - कुटुंबात वाद आणि अपघात होण्याची शक्यता. 


कन्या (Virgo) - वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. 


तूळ (Libra) - समस्याचे निरासन होईल आणि धनलाभ होण्याची शक्यता.


वृश्चिक (Scorpio) - आरोग्याची खूप काळजी घ्या. 


धनु (Sagittarius) - आरोग्य आणि करिअरकडे लक्ष द्या. 


मकर (Capricorn) - अडकलेली काम पूर्ण होती. प्रत्येक कामात यश मिळेल. 


कुंभ (Aquarius) - डोळे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्या.


मीन (Pisces) - नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता.


(वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)