मेष- दिवस उत्साहात जाईल. आर्थिक चणचण दूर होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळेल. मोठ्या ताकदीने कामाच्या ठिकाणी सर्व कामं पूर्ण कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रयत्न करा, अडचणी दूर होतील. कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर राखा आनंद मिळेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- विविध कामांमध्ये व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जनाची संधी मिळेल. वेळ चांगली आहे.काहीतरी जुनं काम आठवेलं. अनेक कामांमध्ये तुम्ही सक्रिय असाल. पुढे जाण्यासाठी आयुष्यात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. 


मिथुन- अतिघाईत कोणतंही काम करु नका. आर्थिक व्यवस्थेचा जास्त विचार करु नका. वायफळ खर्च होईल. आरोग्यावर लक्ष द्या. ड्रायव्हींग सांभाळून करा. कामाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असेल. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. 



कर्क- कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. हट्ट कराल तर, अडचणीत येऊ शकता. विचार करण्यात जास्त वेळ गमावू नका. कामाच्या ठिकाणी मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. डोकेदुखी उदभवेल. कोणाशी पैशांचा व्यवहार करु नका. 


सिंह- कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या ठिकाणी काही नव्या संधी आणि नवे करार होण्याची शक्यता आहे. कोणा एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी आहे. लहान मुलांमुळे दिवस चांगला जाईल. तुमचं लक्ष कोणा एका दुसऱ्याच गोष्टीवर असेल. साथीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. 


कन्या- कामकाज वाढेल. कनिष्टांचं सहकार्य लाभेल. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. अधिकाधिक अडचणी दूर होतील. अपूर्ण कामं पूर्णत्वास जातील. शक्य तितका जास्त आराम करा. स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी लागणार आहे.


तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. काही बाबतीत अधिकाधिक प्रयत्न करावे लागू शकतात. नशिबाची साथ आहे. इतरांना न दुखावता कामं पूर्णत्वास न्या. कोणावरच तुमच्या भावना लादू नका. 


वृश्चिक- व्यापारात होणारा फायदा कमी असेल. बदलीचा योग आहे. नवी कामं हाती घेण्याची संधी आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. विचाराधीन असणारी कामं पूर्ण होणार नाहीत. 


धनू- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचे योग आहेत. विचारपूर्वकपणे निर्णय घ्या फायदा होईल. कुटुंब आणि समाजात तुमचं स्थान उंचावेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. साथीदासासोबतचे तुमचे संबंध चांगले असतील. खाण्यात तिखट पदार्थांचं सेवन टाळा. 


मकर- आज काही नवे करार न करणं उत्तम. पैसे अडकण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात फारशी चांगली नसेल. कुटुंबातीलच व्यक्तींमुळे अडचणीत येऊ शकता. नात्यांमध्ये काही अडचणी येतील. खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या. 


कुंभ- अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. कुटुंबातील संबंध अधिक चांगले होतील. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. विचाराधीन असणारी कामं पूर्ण होतील. वैवाहिक व्यक्तींच्या आयुष्यात सुख असेल. 


मीन- व्यापार वाढवण्याचे प्रयत्न करु नका. महागड्या वस्तूंची खरेदी करू शकाल. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. दिवस चांगला आहे. निर्णय घेताना घरातील मंडळी आणि मित्रपरिवाराचा सल्ला घ्या.