राशीभविष्य | शनिवार | 27 जुलै 2019
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : अनेक दिवसांपासून राहीलेली कामे पूर्ण होतील. पारिवारीक संबंध सुधारतील. आपली प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. विचार केलेली कामे पूर्ण होतील. तुमच्यासाठी दिवस उत्साहवर्धक आणि मनोरंजक असेल. पारिवारीक प्रश्नांवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
वृषभ : कार्यक्षेत्रात सन्मान मिळू शकेल. मेहनत घेऊ पैसे कमावू शकाल. जी कामे काही दिवसांपासून अडकली होती ती पूर्ण होतील. नवे करार किंवा नवे संबंध बनवण्याची शक्यता आहे. वेळ चांगली आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणी सक्रीय असाल.
मिथून : घाई करुन कोणते काम करु नका. पैशांच्या स्थितीबाबत काळजी घ्यावी लागेल. तुमचा वायफळ खर्च होतील. नोकरी किंवा व्यवसायात अडचणी वाढू शकतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. पोटाशी संबंधीत आजार वाढण्याचे योग आहेत.
कर्क : नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. नेहमीच्या कामातल्या जोखीम वाढतील. हट्ट कराल तर कोणाशी तरी भांडण होण्याची शक्यता आहे. विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका. अचानक तुमच्या अडचणी वाढतील. काही बाबतीत लोकांची मदत मिळणार नाही.
सिंह : परिवारात सुख-शांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होतील. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. कोणत्या तरी चांगल्या मित्रासोबत ओळख होण्याचे योग आहेत. दुसरीकडे तुमचे लक्ष जास्त असेल.जोडीदाराला आर्थिक मदत कराल. सोबत काम करण्यांकडे आकर्षित व्हाल.
कन्या : व्यवसाय वाढेल. कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. खास लोकांच्या भेटीगाठी होतील. नेहमीच्या कामातून काही वेळ काढता येईल. तुमच्या अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. अर्धवट राहीलेली कामे पूर्ण होतील. लोकांकडून सहकार्य मिळेल.
तूळ : नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. विशेष लाभ मिळण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल. स्वत:चा फायदा कसा होईल याची काळजी नक्की घ्या. तुमच्या भावना एखाद्यावर जबरदस्ती थोपू नका.
वृश्चिक : व्यवसायात कमी फायदा होईल. बदली होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवे काम सुरु करु नका. ठरवलेली कामे पूर्ण न झाल्याने तुमचा मूड खराब होईल. अविवाहीत लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील.
धनू : रोजची कामे पूर्ण होण्याचे योग आहेत. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होईल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. आरोग्यात चढउतार पाहायला मिळतील. जेवणात मसालेदार पदार्थ टाळा. प्रेमसंबंधात यश मिळेल.
मकर : नव्या व्यवहारांसाठी दिवस चांगला नसल्याने पैसे येणे देखील थांबू शकते. परिवारातील लोक तुम्हाला कठीण प्रसंगात नेऊ शकतात. आज तुम्ही तुमचे प्लानिंग गुप्त ठेवा. वादात अडकू शकता. कामाच्या ठिकाणी कौतूक होईल.
कुंभ : आर्थिक अडचणी दूर होतील. कमाई आणि खर्च बरोबर होईल. कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमची कामे लवकर संपवाल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
मीन : व्यवसायात वाढ न केल्यासच बरे होईल. जसे सुरु आहे तसेच सुरु राहूदे. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. सावधानी बाळगा. लव लाईफसाठी दिवस चांगला आहे. झोप आणि थकवा जाणवेल.