मेष - अनेक समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणती मोठी गुंतवणूक केल्यास फायदा होईल. काम किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार कराल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला. रखडलेले पैसे मिळतील. कामात घाई करु नका. काही गोष्टींबद्दल काळजी वाटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - स्वत:वर विश्वास ठेवून मेहनत करा.  व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखू शकता. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. डोकेदुखी होऊ शकते. मतभेद होऊ शकतात. शांत राहाल तर फायदा होईल.


मिथुन - विद्यार्थ्यांना मेहनतीने अधिक चांगले परिणाम मिळतील. आज तुम्ही नवे प्रयोग कराल. लोकांशी तुमचा ताळमेळ राहील. कुटुंबातील लोकांशी संबंध सुधारण्यास मदत होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता. कोणत्याही गोष्टी अधिक ताणू नका. तब्येत ठिक राहील.


कर्क - आज तुम्ही प्रयत्न कराल तर यश मिळेल. कोणालाही तुमची बाजू पटवून देऊ शकता. एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. समस्या वाढू शकतात. कामात मन न लागल्याने कामात अडचणी येऊ शकतात. अनेक लोक तुमच्या संपर्कात राहतील. अनेक गोष्टींसाठी तुम्हाला सूचना मिळू शकतात. अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते. 


सिंह - व्यवसायात फायदा होईल. काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. नोकरीत नवे पद मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीत फायदा होऊ शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दिवस चांगला आहे. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वत:च्या कामावर संतृष्ट नसाल. जरुरी चेकअप करुन घ्या. 


कन्या - चांगले प्लानिंग आणि विचारामुळे तुम्हाला फायदा होईल. कार्यालयातील कोणत्यातरी जोखमीच्या कामात तुम्हाला यश मिळेल.  कोणतंही जोखमीचं काम करु नका. वाद होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींमुळे समस्या वाढू शकतात. बोलताना विचार करुन बोला. अधिक काम केल्याने थकवा जाणवेल. घाईत काम करु नका. तब्येतीत सुधारणा होईल.


तुळ - आर्थिक गोष्टींसाठी दिवस अनुकूल आहे. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस काही प्रमाणात नकारात्मक राहील. कामं पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत.


वृश्चिक - कार्यालयात तुम्हाला अधिक जबाबदारी मिळू शकेल. दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. अशा लोकांच्या भेटी होतील जे तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतील. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. व्यवसायात कामं अपूर्ण राहतील. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. इतरांसोबत संबंध तणावपूर्ण राहतील. 


धनु - नोकरदारवर्गासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक प्रकरणात सामंजस्याने घ्या. बढतीची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादे मोठे काम मिळू शकते. त्यात यशस्वी व्हाल. बिघडलेली परिस्थिती बदलण्यात यशस्वी व्हाल. जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस ठिक आहे.


मकर - उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मदत मिळेल. जोडीदारासोबत वेळ काढाल. फिरण्याचा प्लान होऊ शकतो. नोकरदारवर्गाला नवीन काम मिळू शकते. पोटासंबंधी आजार होऊ शकतो. लोकांचे लक्ष तुमच्यावर राहील. 


कुंभ - व्यवसायात वादाची परिस्थिती येऊ शकते. मेहनत वाढेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर निराश होऊ शकता. कामासाठी वेळ लागेल. पैशांच्या बाबतीत मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमचे विचार योग्यरित्या मांडता येणार नाहीत. तब्येत ठिक राहील. 


मीन - गुंतवणूक करताना सावध राहा. धनहानी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करु नका. अधिक मेहनत घ्यावी लागेल. जवळची व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या.