मेष- धनलाभ होण्याची शक्यता. हितशत्रूंना शह देण्यात यशस्वी व्हाल. आज मनाला शांती मिळेल. ऑफिसमध्ये कामाचा भार वाढेल. मात्र, बढतीची शक्यता. आजुबाजूच्या लोकांकडून आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या कामाने आणि बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडाल. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. प्रवासाचा योग संभवतो. येणाऱ्या काळात याचा फायदा होऊ शकतो. जवळची माणसं खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद होईल.


मिथुन- आर्थिक आवक वाढेल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आवडीची कामे करायला मिळतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाच्या पद्धतीत बदल करा. 


कर्क- करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रित कराल. मित्रांशी भेटीगाठी होतील. एखादी शुभवार्ता कानावर पडेल. कामात व्यस्त असाल. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांची आठवण येईल. 


सिंह- सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय असाल. कठीण परिस्थितीत लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील. अनेकजण गुप्तपणे मदत करतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. 


कन्या- आजचा दिवस सामान्य असेल. आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणुकीची योजना आखाल. तुमच्या आजुबाजूला गजबजाट असेल. मात्र, एकाग्रतेने काम करू शकाल. मेहनत जास्त करावी लागेल. मात्र, यशही पदरात पडेल. 


तूळ- तुमची कामे विनासायास पार पडतील. काहीजण तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज. आर्थिक संधीकडे लक्ष ठेवा. लोकांची मदत मिळेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. 


वृश्चिक- बढती आणि आर्थिक उन्नती होण्याचा योग. नव्या ठिकाणी जायला मिळेल, नवीन गोष्टी शिकता येतील. प्रेमप्रकरण पुढे सरकेल. कामाच्या ठिकाणी स्वत:च्या कामगिरीकडे लक्ष द्या. 


धनू- महत्त्वाच्या लोकांशी चांगला ताळमेळ ठेवाल. याचा फायदा होऊ शकतो. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. काही नवे पेच उभे राहू शकतात. तुमचा सल्ला दुसऱ्यांसाठी उपयोगी येईल.


मकर- नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीविषयी कुटुंबीयांशी चर्चा कराल. काही कामे लवकर उरकावी लागतील. 


कुंभ- कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी विचार करा. दुसऱ्यांची मदत कराल. ठरवलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक होईल.


मीन- तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडण्याची शक्यता. तणाव कमी होईल. एखाद्या गोष्टीविषयी दुसऱ्यांचा सल्ला घ्याल. घरात जास्त काम करावे लागू शकते. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल दिवस.