Rules of Keeping Conch:हिंदू धर्मात शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, समुद्र मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रगट झाल्या तेव्हा शंखाची निर्मिती झाले. त्यामुळं घरात शंख ठेवणे खूप शुभ मानलं जातं. शंखाच्या ध्वनीने घरातील नकारात्मकता संपते आणि घरात सकारात्मक लहरींचा अनुभव येतो. पण घरात शंख ठेवण्याचेही काही नियम असतात. तर तुम्हीदेखील घरात शंख ठेवत असाल तर या काही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घरात शंख ठेवण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या. 


1. शंख जमिनीवर ठेवू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंख चुकूनही जमिनीवर ठेवू नका. जमीनीवर शंख ठेवल्याने त्याचा अपमान होऊ शकतो. शंख वापरुन झाल्यानंतर तो नेहमी धुवून स्वच्छ करुन ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा की, शंखावर एकही पाण्याचा थेंब राहू देऊ नका. त्यामुळं शंखाचे नुकसान होऊ शकते. 


2. नेहमी देव्हाऱ्यात ठेवा


देव्हारा हे घरातील सर्वात शुद्ध स्थान मानले जाते. नेहमी लक्षात ठेवा की पुजेसंदर्भातील सर्व पुस्ता देव्हारा किंवा देव्हाऱ्याच्या खणातच ठेवा. धार्मिक मान्यतांनुसार, शंख नेहमी भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी यांच्याजवळच ठेवावा. शंखाच्या शुद्धतेसाठी नेहमी त्याच्यावर कपडा टाकून ठेवावा.


3. घरात शंख कधी आणावा


घरात शंख आणण्याचा सर्वात शुभ दिवस शिवरात्री, नवरात्री आणि श्रावणातील दिवस असल्याची मान्यता आहेत. या दिवसांत तुम्ही घरात शंखाची स्थापना करु शकता. या दिवसांत शंख घरात आणल्याने सुख समृद्धी नांदते. 


4. शंख फुंकल्यानंतर असा करा साफ


पूजा झाल्यानंतर अनेकजण शंख फुंकतात त्यानंतरही त्याचे पावित्र्य जपणे खूप महत्त्वाचे मानले जाते. शंख फुंकल्यानंतर त्याची शुद्धता राहण्यासाठी गंगाजल आणि पाण्याने धुवा. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने साफ करा आणि पाण्याचा एक थेंबही शंखावर ठेवू नका. अशाने शंखाची शुद्धता कायम राहते. 


5. या पद्धतीने ठेवा शंख


शंख घरात किंवा देव्हाऱ्यात ठेवताना शंखाचा तोंड वरच्या बाजूने ठेवा. यामुळं घरात सकारात्मकता कायम राहते व नकारात्मकता दूर होते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )