आजचे राशिभविष्य | मंगळवार | १ ऑक्टोबर २०१९
कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - कोणतंही काम टाळू नका. नोकरी, व्यवसायातील टारगेटकडे पूर्ण लक्ष द्या. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नवीन व्यक्तीशी भेट होणयाची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत कामासंबंधी गोष्टी शेअर करु शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
वृषभ - नव्या संधी मिळू शकतात. तुमच्या योजनांवर सहमती मिळू शकते. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहा. जोडीदाराप्रती जबाबदारी वाढू शकते. शांत राहा. नवीन लोकांच्या भेटीने फायदा होऊ शकतो.
मिथुन - नोकरीसंबंधी नव्या ऑफर मिळू शकतात. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात. खास कामासाठी सुरुवात करु शकतात. उत्साही राहाल. जुन्या योजनांवर पुन्हा कामाची सुरुवात करु शकता. कामाकडे लक्ष द्या. मनात येईल त्याच गोष्टी करण्याकडे कल असेल.
कर्क - आधी केलेल्या कामांचा आता फायदा होऊ शकतो. जुने मित्र अचानक मदत करु शकतात. धार्मिक यात्रेसाठी योजना आखू शकता. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांत जोडीदाराची साथ मिळू शकते.
सिंह - तुमच्या बुद्धीने सर्व सांभाळण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत सोबत काम करणाऱ्यांची मदत होईल. पुढे जाल. अधिक जबाबदारी मिळू शकते.
कन्या - पुढे जाण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. नवीन विचार मनात येऊ शकतात. विवाह प्रस्ताव येण्याचा योग आहे. एखाद्या खास गोष्टीबाबत तुमचे विचार बदलू शकतात.
तुळ - व्यस्त राहाल. अतिशय शांतपणे काम करा. दुसऱ्यांचे मतही विचारात घ्या. जोडीदाराशी तुमच्या मनातील गोष्ट शेअर करु शकता. कागदोपत्री व्यवहारांकडे लक्ष द्या. प्रसन्न वाटेल. जबाबदारी वाढू शकते.
वृश्चिक - समस्या असल्यास सोडवण्याचा प्रयत्न करा. यात यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी मनात ठेऊ नका. पुढे जाण्याचा प्रयत्न करा. बदल करणं फायद्याचं ठरु शकतं. सकारात्मक राहा.
धनु - खास कामासाठी मित्रांची मदत मिळू शकते. महत्त्वपूर्ण गोष्टींवर निर्णय घेऊ शकता. मित्रांसोबत अधिक वेळ जाऊ शकतो. जोडीदाराशी संबंध अधिक सुधारु शकतात. चांगलं बोलून तुमची काम पूर्ण करु शकता.
मकर - दिवस चांगला आहे. समस्या संपण्याची शक्यता आहे. यश मिळेल. पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्या. इतरांशी बोलण्याने समस्यांवर मार्ग मिळू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात नवी संधी मिळू शकते. कामं विचार करुनच करा.
कुंभ - महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. समजूतीने काम करा. प्रवास होऊ शकतो. जुना वाद संपू शकतो.
मीन - कामं पूर्ण होतील. फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत कार्यक्रम ठरवू शकता. पैशांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तब्येतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाची गोष्ट समजू शकते.