आजचे राशीभविष्य | रविवार | ३ नोव्हेंबर २०१९
कसा आहे तुमचा आजचा दिवस?
मेष - अधिक वेळ कामात जाऊ शकतो. घरातील व्यक्तींसाठी वेळ काढा. काही महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करुनच पुढे जा.
वृषभ - कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला जाईल.
मिथुन - आजू-बाजूच्या गोष्टींमुळे विचलित होऊ नका. कामाकडे लक्ष द्या. कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्या. मित्रांसोबत वेळ घालवू शकता.
कर्क - तुमच्या ध्येयाकडे आज अधिक लक्षकेंद्रीत कराल. कामाचा ताण वाटू शकतो. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. पुढील योजना आखण्यास दिवस चांगला आहे. फायदा होण्याची शक्यता आहे.
सिंह - कामात मन लागणार नाही. मनात अनेक विचार सुरु राहतील. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करु नका. अधिक ताण घेऊ नका. आराम करा. मित्रांसोबत वेळ घालवू शकता.
कन्या - करियरकडे लक्ष द्या. कामासंबंधी आखलेल्या योजना फायद्याच्या ठरु शकतात. काही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचा फायदा होऊ शकतो.
तुळ - कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवू शकता. स्वत:च्या फायद्याचा, करियरबाबत विचार करा. महत्त्वाच्या लोकांशी झालेली भेट फायदेशीर ठरु शकते. जोडीदाराला वेळ द्या. त्यांच्या भावनांचा आदर करा.
वृश्चिक - नवी जबाबदारी मिळू शकते. कामात सावध राहा. नोकरीमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. काही नव्या संधी मिळतील. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते.
धनु - महत्त्वाच्या कामासाठी मित्रांची मदत होऊ शकते. आरोग्य सुधारेल. स्वतःचे काम आणि जबाबदारीकडे लक्ष द्या. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मकर - काम करण्याच्या पद्धतीत थोडे बदल होतील. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होऊ शकतात. जबाबदारीवर प्रश्नचिन्हं उभं राहू शकतं. काही व्यक्ती तुमच्या मेहनतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु शकतात.
कुंभ - लोकांशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. करिअरबद्दलच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. स्वतःच्या कार्यक्षेत्राबाबत अधिक विचार कराल.
मीन - संपूर्ण विचार करुनच निर्णय घ्या. महत्त्वाच्या कामात विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबासाठी वेळ द्या. महत्त्वाची कामं पूर्ण करा.