घर आणि दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची का बांधतात? यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या
Lemons and Peppers: बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानांच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात. असे सांगितले जाते की...
मुंबई : Lemons and Peppers: बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानांच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात. असे सांगितले जाते की, कोणाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून. पण त्यामागील विज्ञान (Science) तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या.
तुम्ही पाहिले असेलच की अनेक लोक आपल्या घराच्या आणि दुकानांच्या बाहेर लिंबू मिरची बांधतात. प्रामुख्याने प्रत्येक शनिवारी लिंबू-मिरची बांधली जाते. अनेक जण आपल्या वाहनांमध्ये लिंबू मिरचीही लटकवतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात. त्याचवेळी, काही लोक लिंबू मिरची लटकवण्यावर विश्वास ठेवतात. लोकांचा असा विश्वास आहे की लिंबू मिरची लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरावर कोणाची नजर राहत नाही. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी लोक लिंब-मिरची घराबाहेर टांगतात. पण घराबाहेर लिंबू मिरची लटकवण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
वाईट नजरेपासून संरक्षण मिळते
वास्तू शास्त्रानुसार घर आणि दुकानांच्या बाहेर लिंबू - मिरची लटकवल्याने वाईट नजर पडत नाही. त्यापासून संरक्षण मिळते. लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. लिंबू-मिरची टांगल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपत्तीपासून दूर राहते. जर तुम्ही ते दुकानात टांगले तर तुमचा व्यवसाय वाढेल.
यामागे शास्त्र काय आहे?
घर किंवा दुकानांच्या मागे लिंबू-मिरची लटकवण्यामागेही विज्ञान दडलेले आहे. वास्तविक, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर मिरची, लिंबू यासारख्या गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या मनात त्याची चव जाणवू लागते. यामुळे आपण त्याला बराच वेळ पाहू शकत नाही आणि लगेचच तिथून आपले लक्ष दुसरीकडे वळवतो.
आरोग्याचेही रक्षण करते
यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. आपण ते कोणत्याही दारावर टांगले तर त्याच्या उग्र वासामुळे माश्या आणि किटक घरात प्रवेश करत नाहीत. त्यामुळे सभोवतालचे वातावरणही शुद्ध होते. घराबाहेर टांगल्याने आपले आरोग्यही चांगले राहते.
प्लॅस्टिक लिंबू - मिरची लटकवू नका !
आजकाल प्लास्टिकपासून बनवलेल्या लिंबू - मिरच्याही बाजारात मिळतात. बरेच लोक ते आपल्या घरात आणि दुकानात टांगतात. त्याचा काही उपयोग नाही. कारण यातून ना वास येत आहे, ना वास्तूनुसार काही फायदा आहे. त्यामुळे घरात नेहमी ताजे लिंबू आणि मिरची वापरावी आणि रोज बदलत राहावी.