Kumbha Sankranti 2023 : हिंदू धर्मात संक्रांतीचे विशेष महत्त्व सांगण्यात आलंय. या दिवशी स्नान आणि दानाचे खूप महत्त्व आहे. मकर संक्रांती नंतर आज कुंभ संक्रांत आहेत. आज सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला आपण कुंभ संक्रांती म्हणतो कारण यावेळी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीला जसं महत्त्वं आहे तसंच कुंभ संक्रांतीच पण महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. (Kumbha Sankranti 2023 sun transit in aquarius know puja vidhi rules shubh muhurat upay daan snan in marathi)


शुभ मुहूर्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी 09:57 वाजता सूर्य मकर रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यावेळी सूर्याची कुंभसंक्रांती सुरु होईल. संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही पवित्र नदीत स्नान करू शकता. स्नान केल्याने शुभ फळ प्राप्त होतं. तर संक्रांती ही सूर्यदेवाची असते आणि जर तुम्ही या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न केले तर सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहते.


अशी करा सूर्यपूजा 


  1. सूर्याची आराधना करून व्रत केल्यास मनाप्रमाणे फळ मिळते.

  2. आज उपवास ठेवण्याचाही फायदा होतो.

  3. सूर्यदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र नदीत स्नान करा.

  4. सूर्यदेवाला तीळ आणि जल अर्पण करा.

  5. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा.

  6.  सूर्यदेवाला रोज पाणी द्यावं.

  7. आजच्या दिवशी पाण्यात रोळी किंवा लाल रंग मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.


संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा


  • सूर्य संक्रांतीच्या दिवशी माकड, पर्वतीय गाय किंवा कपिला गायीला अन्न अर्पण करा.

  • भगवान श्री विष्णूची पूजा करावी.

  • गूळ किंवा साखर खाल्ल्यानंतर पाणी पिल्यानंतरच घराबाहेर पडा.

  • भगवान सूर्याची स्तुती करताना आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.

  • पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घाला.

  • हनुमानजी आणि शनिदेवाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा.

  • शनिदेवाला तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करा.

  • गरजू लोकांना अन्न आणि उबदार कपडे दान करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)