Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house)


कुंकुमार्चन विधी कोणावर करावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करु शकता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा मग कुंकुमार्चन पूजा करावी.


देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय?


देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते. देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे. 


कुंकुमार्चन कधी करावे?


अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, गुरु पुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करावे. त्याशिवाय तुम्ही मंगळवार, शुक्रवारीही कुंकुमार्चन करु शकता. अमावस्येला ही पूजा करु नये म्हणून पाचव्या गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजेपूर्वी हा विधी करावा. 


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?


कुंकुमार्चन करतांना कोणती काळजी घ्यावी?


कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू स्वच्छ करुन ताटात ठेवावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच अंगठा, मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकु घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अपर्ण करावे. तर कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटप करावं. तर घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावणं शुभ मानलं जातं. मात्र हे कुंकू पुन्हा पूजेत अजिबात वापरु नयेत. 


कुंकुमार्चन मंत्र 


या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता,


 नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः ||


कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे?


कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते, असं शास्त्रात मान्यता आहे. मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असं म्हटलं जातं. तर शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)