मुंबई : तुम्ही कधी स्वप्नात पाल पाहिलीये का? स्वप्नात पाल वेगवेगळ्या स्वरूपात दिसणं अनेक चांगले आणि वाईट संकेत देतात. हे संकेत समजून घेऊन प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजावेत, कारण स्वप्नात पाल दिसण्याचे काही संकेत अत्यंत अशुभ मानले जातात. स्वप्नात पाल दिसणे काय सूचित करतं ते जाणून घेऊया.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जर स्वप्नात पाल एखाद्या किटकाला मारताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही सावध रहा. तुमच्या घरात काही अडचणी येऊ शकतात.

  • तुमच्या स्वप्नात पाल भिंतीला चिकटलेली पाहणं आणि नंतर तो तुमच्यावर झेपावताना पाहणं म्हणजे शत्रूला तुमचं नुकसान करायचं आहे. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहा.

  • स्वप्नात पाल तुमच्या घरात शिरताना पाहण्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला काही समस्येची भीती वाटतेय. जर तुम्ही त्या पालीला मारलं तर ते चांगलं लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही ती समस्या सोडवलीये.

  • स्वप्नात एखादी छोटी पाल पाहणं देखील चांगलं नाही. हे सूचित करतं की तुमच्या कामात अडथळा येणार आहे.

  • जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृत पाल दिसली तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही काही महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतायजे हानिकारक असू शकतं.

  • स्वप्नात एकापेक्षा जास्त पाली एकत्र पाहणं देखील अशुभ आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही तणावाखाली आहात आणि मानसिक दबावाखाली चुकीच्या गोष्टी करू शकता. त्यामुळे समस्या ओळखा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

  • (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)