Lord Shiva Worship Tips: हिंदू धर्मात शंकराची उपासना (Lord Shiva) अत्यंत कल्याणकारी मानली जातं. शंकराची आराधना (Lord Shiva Worship) करणार्‍या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं भय नसतं, असं मानलं जातं. शिवाच्या कृपेने त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि यश प्राप्त होतं. सोमवार (Somwar) हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. पूजेचे काही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला पूजेचं फळ मिळत नाही. शंकराला चुकूनही काही गोष्टी अर्पण (Lord Shiva Worship Tips) करू नका, जर त्या गोष्टी केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. (lord shiva worship tips dont offer these things to lord shiva astro tips)


कोणत्या गोष्टी टाळाव्यात? (lord shiva worship tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचं पान (basil leaves) अर्पण करू नये. असं केल्यानं तुम्हाला तुमच्या उपासनेचं फळ मिळत नाही. भगवान शंकराने तुलसीचा पती असुर जालंधरचा (Asura Jalandhar) वध केला. म्हणूनच भगवान शिवाला त्यांच्या अलौकिक गुणांनी पानांपासून वंचित केलं होतं, असं मानलं जातं.


शंकराची पूजा करताना शंखाचा (shell) वापर करू नये, असं म्हणतात. अनेक लोकं शंखानं जलाभिषेक करताना दिसतात. शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणूनच शिवपूजेत शंख वापरला जात नाही, अशी मान्यता आहे.


आणखी वाचा - Mahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!


भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा करताना लाल रंगाचे कोणतेही साहित्य वापरू नये. लाल रंग रागाचं प्रतिक आहे. त्याचबरोबर भगवान शंकराला नारळाचं पाणी (coconut water) अर्पण करू नये. असं केल्यानं उपासनेचं फळ मिळत नाही, असं सांगण्यात येतंय.


भगवान शंकराची पूजा करताना केतकीच्या फुलांचा (ketki flower) वापर करू नये. केतकीचं फूल भगवान शंकराची पूजा करण्यासाठी शापित मानलं जातं. त्यामुळे त्याचा वापर केला जात नाही. भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंदूर (Vermilion) कधीही वापरू नका. हा शंकराचा अपमान मानला जातो.