Vastu Tips: घरामध्ये सुख-समृद्धी रहावी म्हणून अनेकदा लोक वास्तुशास्त्राचा (Vastu Shastra) आधार घेतात. अनेकदा घरांमध्ये शुभ मानली जाणारी झाडं (Lucky Plant For House) ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रामध्येही असाच उल्लेख आहे. वास्तुशास्त्र घराची दिशा आणि दशेबरोबरच घर, ऑफिस आणि जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टींचे संकेत देते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे शुभ मानली जाणारी झाडं असं म्हटलं की सर्वात आधी मनी प्लॅण्टचा (Money Plant) विचार डोक्यात येतो. मात्र आपण इथं या झाडाबद्दल बोलणार आहोत ते झाड मोरपंखी झाड (Morpankhi Plant) नावाने ओळखळं जातं. हे विद्येचं झाड म्हणून ओळखलं जातं. जाणून घेऊयात हे झाड घरामध्ये ठेवल्याने वास्तुवर त्याचा काय परिणाम होतो.


मोरपंखीची वैशिष्ट्यं काय?


मोरपंखी ही फार वेगाने वाढणारी वनस्पती आहे. या झाडाची पानं काट्यासारखी दिसतात. वास्तुशास्त्रानुसार मोरपंखी घरात ठेवल्यास त्याने घरात सुख-समुद्धी कायम राहते. मात्र या वनस्पतीसंदर्भात वास्तुच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींची काळजी घेण्याची फार गरज असते.


मोरपंखीसंदर्भातील काळजी आणि फायदे...


> मोरपंखी लावलेली कुंडी घराच्या दरवाजाजवळ ठेवणं फार चांगलं मानलं जातं.


> जे लोक मोरपंखी घरात ठेवतात त्यांना त्यांचं भाग्य साथ देतं असं मानतात.


> मोरपंखी हे बुद्धी, पैसा आणि सुख वाढवणारी वनस्पती आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं.


> वैवाहिक लोक घरी हे झाड ठेवणार असतील या वनस्पतीचं एक रोपटं ठेवण्याऐवजी दोन रोपटी ठेवणं अधिक फायद्याचं मानलं जातं. यामुळे वैवाहिक आयुष्य अधिक सुखी राहतं असं म्हणतात.


> केवळ सज्ञान व्यक्तीचं नाही तर लहान मुलांसाठीही मोरपंखी फायद्याचं ठरतं. मोरपंखी असलेल्या घरातील मुलांमध्ये विद्यार्जनाची इच्छा निर्माण होते आणि ती टिकून राहते असं म्हणतात.


या वनस्पतीही फायद्याच्या


बांबूचं छोट्या आकाराचं झाडही घरी लावलं जातं. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी येते असं म्हणतात. तसेच घरात शांतता टिकून राहण्यासाठी बांबूचं झाड फायद्याचं ठरतं. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅण्ट घरी लावल्यास त्याचा सकारात्मक परिणाम घरातील आर्थिक स्थितीवर होतो. मनी प्लॅण्ट घरात असेल तर अर्थार्जन वाढतं असं म्हटलं जातं. तसेच स्नेक प्लॅण्टमुळे घरातील सकारात्मक ऊर्जाही वाढते. वास्तुनुसार स्नेक प्लॅण्टमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कमी होतो, असं म्हणतात.


धार्मिक मान्यतांनुसार सर्व शुभ झाडांमध्ये तुळसही अग्रस्थानी आहे. तुळशीचं रोपटं घरात लावल्याने भगवान विष्णूची कृपावृष्टी घरावर राहते असं म्हणतात.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.