Lucky Zodiac Sing for July 2022:  प्रत्येक नवीन महिना लोकांसाठी एक नवीन आशा घेऊन येतो. जून महिना आता संपत आला असून जुलै महिन्याचे वेध लागले आहेत. जुलै महिना कसा असेल यासाठी ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असते. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत, ज्यांचे शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर दिसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलैमध्ये सूर्य, शुक्र, बुध असे मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. 68 दिवसांनंतर 2 जुलै रोजी बुध आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर 16 जुलै रोजी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. या महिन्यात मंगळ आणि शुक्राचे राशी परिवर्तनही होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना या सर्वांचा फायदा होणार आहे.


सिंह - ज्योतिष शास्त्रानुसार हा काळ खूप अनुकूल असणार आहे. तुम्हाला ग्रह राशी बदलाचा लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही ऑफिसमध्ये चांगले काम कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच नोकरीची ऑफर देखील येऊ शकते. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. तसेच व्यवसायातही फायदा होईल.


धनु - या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून हा महिना लाभदायक असणार आहे. या काळात पैशाच्या आगमनाचे नवीन मार्ग खुले होतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. 


मिथुन - या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना देखील शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. या दरम्यान काही मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल आहे. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. जुलैमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल राहील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)