मुंबई : हिंदू धर्मानुसार ग्रहणकाळ हा अशुभ मानला जातो. या कालावधीमध्ये शुभ कार्य केली जात नाहीत. ग्रहण संपेपर्यंत काही गोष्टी पाळव्यात असं जुने लोक सांगतात. या काळात पूजा आणि विधी करून चंद्रग्रहणाचे होणारे परिणाम टाळण्याचा प्रयत्न केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. 80 वर्षांनंतर ग्रह आणि नक्षत्रांचा योग आल्याचं सांगितलं जात आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक काळ पाळला जाणार नाही असंही सांगितलं जात आहे. 


चंद्रग्रहणात काही गोष्टी करणं टाळावं. त्याचे परिणाम आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर आणि पैशांवर होतो. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहण काळात करू नयेत जाणून घेऊया. 


- ग्रहणकाळ धार्मिक दृष्ट्या अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीमध्ये कोणतेही शुभकार्य करू नये. आर्थिक व्यवहार केल्यानेही नुकसान होऊ शकतं. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतात. 
- धारदार गोष्टींचा वापर करू नये. गर्भवती महिलांनी या नियमाचं पालन करावं. तेलाचा प्रयोग करू नये, कुलूप उघडू नये.
- गर्भवती महिलांसाठी ग्रहणकाळ अशुभ मानला जातो. ग्रहण कालावधीमध्ये महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला त्यांना दिला जातो. तो सल्ला त्यांनी बाळासाठी पाळणं गरजेचं आहे. 
- ग्रहण संपल्यानंतर गंगाजलने शुद्धी करून त्यानंतर जेवण करावं. 
- ग्रहणापासून वाचण्यासाठी स्नान करा, चांगल्या मनाने दान करा. त्यामुळे आयुष्यात आनंद राहील. नोकरी आणि आर्थिक लाभ मिळत राहतील.